Divya Pahuja Murder Video: माजी मॉडेल दिव्या पाहुजाची हत्या; समोर आला धक्कादायक व्हिडिओ, मृतदेह ओढताना दिसले हॉटेलचे कर्मचारी (Watch)
Divya Pahuja Murder Video

Divya Pahuja Murder Video: दिल्लीला (Delhi) लागून असलेल्या गुरुग्राममध्ये (Gurugram) 27 वर्षीय मॉडेलची हत्या झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. दिव्या पाहुजा (Divya Pahuja) असे मृत मॉडेलचे नाव आहे. या मॉडेल हत्येप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेलमधून निळ्या रंगाच्या बीएमडब्ल्यूमध्ये मॉडेलचा मृतदेह घेऊन जात असताना आरोपींना अटक केली. ही मॉडेल 2016 मध्ये मुंबईत एका वादग्रस्त चकमकीत मारला गेलेला हरियाणातील गँगस्टर संदीप गडोलीची गर्लफ्रेंड असल्याचे पोलिसांनी सांगितले.

याआधी 2016 मध्ये गुरुग्राम पोलिसांनी संदीप गडोलीचा सामना केला होता, ज्यात त्याचा मृत्यू झाला. आता दिव्या पाहुजाचा मृतदेह सापडलेल्या गुरुग्राममधील हॉटेलविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतले आहे. गुरुग्राम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत दिव्या पाहुजा ही गुरुग्रामच्या बलदेव नगरची रहिवासी होती. माहितीनुसार, दिव्या पाहुजाची हत्या गुरुग्रामच्या बसस्थानकाजवळील सिटी हॉटेलमध्ये काल रात्री झाली.

पहा व्हिडिओ-

पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून अटक आरोपींची चौकशी करत आहेत. गुरुग्रामचे डीसीपी पश्चिम भूपेंद्र सिंह सांगवान यांनी सांगितले की, त्यांनी मृत दिव्या पाहुजा हिच्या हत्येप्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे. मुंबईतील एका हॉटेलमध्ये संदीप गडोलीचा एन्काउंटर झाला. त्यामुळे त्या प्रकरणात दिव्या ही एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होती. (हेही वाचा: Double Murder in Budaun: प्रेमी युगुलाची बापाकडून हत्या; बदायूं येथील घटना; पोलिसांना ऑनर किलिंग संशय)

त्या चकमक प्रकरणाने जोर पकडल्यानंतर, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गुरुग्राम पोलीस कर्मचार्‍यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला. दिव्या ही तिची आई आणि पाच पोलिसांसह या प्रकरणात मुख्य आरोपी होती, पण नंतर तिला जामीन मंजूर झाला. दिव्याच्या हत्येप्रकरणी गुरुग्राममधील सिटी पॉइंट हॉटेलच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉटेल मालक अभिजीत आणि त्याच्या साथीदारांनी दिव्याची हत्या केल्याचा आरोप आहे.