नवी दिल्ली: टूलकिट प्रकरणी दिशा रवि हिला दिल्ली पोलिसांच्या सायबर सेल टीमकडून 13 फेब्रुवारीला बंगळुरु येथून अटक करण्यात आली होती. अटक केल्यानंतर तिला कोर्टात हजर केले असता पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्यात आले होते. तर दिशा हिला जामीन मिळावा म्हणून तिच्या वकिलांनी सुद्धा प्रयत्न केले. परंतु कोर्टाने दिशा रवि हिचा जामीन नाकारला. तर पटियाला हाउस कोर्टात मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान दिशा रवि हिची पोलीस कोठडी संपण्यापूर्वी एक दिवस आधीच जामीन दिला आहे.
कोर्टात पार पडलेल्या सुनावणी दरम्यान दिल्ली पोलिसांकडून कोर्टाला असे सांगण्यात आले की, दिशाने टूलकिट तयार केले होते. ज्यामध्ये खलिस्तानची वकिली करणारे दिशा-निर्देशन होते. हे सर्वकाही भारताची प्रतिमा मलील करण्यासाठी केले गेले होते. तसेच हे एक फक्त टूलकिटच नव्हे तर भारताला बदनाम करण्याचा एक कट होता. दिशाला माहिती होते की, ती जर कायद्याच्या कचाट्यात अडकली तर तिचे व्हॉट्सअॅप चॅट्स आणि ईमेल मुळे ती अडचणीत येऊ शकते. त्यासाठी तिने सर्व चॅट्स आणि मेल डिलीट केले. पण दिशाच्या वकिलांनी तिच्यावर दिल्ली पोलिसांनी लावलेले आरोप हे फेटाळून लावले. (Greta Thunberg Toolkit Case: ग्रेटा थनबर्ग 'टूलकिट' प्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; बेंगलुरूमध्ये 21 वर्षीय क्लाइमेट अॅक्टिविस्ट दिशा रवी ला अटक)
Tweet:
Toolkit case: Disha Ravi produced before Patiala House Court at the end of her one-day police custody. pic.twitter.com/FOm7Gzl6Vb
— ANI (@ANI) February 23, 2021
तसेच दिशा रवि हिला जामीन मिळाला असला तरीही कोर्टाने तिला प्रत्येक चौकशीसाठी आणि ज्या वेळी समन्स पाठवले जातील त्याला सहकार्य करावे असे स्पष केले आहे. त्याचसोबत तिला कोर्टाच्या परवानगी शिवाय देश सोडून जाता येणार नाही आहे.
Tweet:
Toolkit case: As a condition to granting bail to Disha Ravi, the court instructed her to continue to cooperate with the ongoing investigations & join the investigation as and when summoned; the court also said that she 'shall not leave the country without court's permission.
— ANI (@ANI) February 23, 2021
दिल्ली कोर्टाकडून दिशा हिला एक-एक लाखांच्या दंडानंतर जामीन दिला गेला आहे. दरम्यान, दिशा हिच्याबद्दल कोर्टात पार पडत असलेल्या सुनावणीचा दिल्ली पोलिसांनी जोरदार विरोध केला. परंतु कोर्टाने दिशा रवि हिच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर तिचा जामीन अर्ज स्विकारला.