Greta Thunberg Toolkit Case: दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल (Delhi Police Cyber Cell) ने ग्रेटा थनबर्ग (Greta Thunberg) टूलकिट प्रकरणात (Toolkit Case) 21 वर्षीय दिशा रवी (Disha Ravi) यांना बेंगळुरू येथून अटक केली आहे. फ्राइडे फॉर फ्यूचर कँम्पेनच्या संस्थापक असलेल्या दिशा रवि यांना शनिवारी अटक करण्यात आली. 4 फेब्रुवारी रोजी दिल्ली पोलिसांनी टूलकिट संदर्भात अज्ञात लोकांविरूद्ध गुन्हा दाखल केला. असा आरोप केला जात आहे की, दिशा रवी यांनी शेतकर्यांशी संबंधित टूलकिटचे संपादन केले आणि त्यात काही गोष्टी जोडल्या आणि त्या पुढे पाठविल्या.
लाल किल्ल्यावर 26 जानेवारीला शेतकर्यांच्या ट्रॅक्टर परेड दरम्यान झालेल्या हिंसाचाराची चौकशी करणारे दिल्ली पोलिस टूलकिट प्रकरणाचा तपास करत आहेत. पर्यावरण संरक्षक ग्रेटा थनबर्ग यांनी नुकतेच एक टूलकिट ट्विट केले. जे तिने नंतर काढून टाकले. या टूल किटचे स्क्रिप्ट लेखक खलिस्तानी संस्था असल्याचे तपासात समोर आले आहे. दिल्ली पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आता दिशा रवीला टूलकिट प्रकरणी अटक करण्यात आली आहे. (वाचा - Farmer Protest in India: शेतकरी आंदोलनाचा मुद्दा परदेशात गाजला; पॉप स्टार रिहाना नंतर ग्रेटा थनबर्गनेही केलं शेतकऱ्यांचं समर्थन)
दिल्ली पोलिसांनी गुगल आणि इतर मोठ्या सोशल मीडिया कंपन्यांना टूलकिटच्या कागदपत्रांमध्ये नमूद केलेल्या ई-मेल आयडी आणि यूआरएलचा तपशील स्पष्ट करण्यास सांगितले होते. पॉप गायिका रिहाना आणि ग्रेटा थनबर्ग सारख्या नामांकित व्यक्तींनी शेतकरी आंदोलनाविषयी ट्विट केले होते.
Delhi Police Cyber Cell arrested 21-year-old climate activist Disha Ravi from Bengaluru on 13th February for her alleged role in spreading 'toolkit' related to farmers protest
— ANI (@ANI) February 14, 2021
दिल्ली पोलिसांचे विशेष आयुक्त प्रवीर रंजन यांनी सोशल मीडियाच्या मॉनिटरिंग दरम्यान एक टूलकिट सापडल्याचे सांगितले होते. त्याच्या लेखकाविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात आला आहे. यात कोणाचं नाव नव्हतं. पोलिसांनी सांगितले की, सोशल मीडिया मॉनिटरिंग दरम्यान पोलिसांना एका अकाऊंटद्वारे दस्तऐवज मिळाले, जे एक टूलकिट आहे. यात 'प्रीव्हर्स अॅक्शन प्लॅन' नावाचा विभाग आहे. यामध्ये शेतकरी चळवळीदरम्यान काय करावे याची माहिती देण्यात आली आहे.