Money प्रतिकात्मक फोटो (Photo Credits PTI)

Sanjay Sing on Demonetisation: जी-20 परिषदेच्या डिनरच्या (G20 Guest Official Dinner Invitatio) निमंत्रण पत्रिकेवर 'प्रेसिडेंट ऑफ भारत' असा उल्लेख आढळला आणि देशभर चर्चेला तोंड फुटले. आता इंडिया ऐवजी भारत वापरले जाणार का? सरकारने बोलावलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनातही हा मुद्दा गाजणार का? अशी चर्चा असतानाच आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी वेगळाच मुद्दा पुढे केला आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, जर इंडिया ऐवजी भारत असा बदल करायचा असेल तर भारतीय चलनी नोटांवरही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे. त्यामुळे त्या नोटेवरुनही इंडिया हे नाव हटवतील. मग पुन्हा नोंटबंदी. पुन्हा रांगेत उभा राहून नोटा बदलून घ्यावे लागणार. संजय सिंह यांच्या विधानानंतर खोरकरच समाजामध्ये चर्चा आहे की, केंद्र सरकार पुन्हा एकदा निश्चलीकरण करणार काय?

संजय सिंह यांनी म्हटले आहे की, आता आपल्याला सरकारच्या कृपेने पुन्हा तिसऱ्या नोटबंदीला सामोरे जावे लागेल. कारण भारतीय चलनातील प्रत्येक नोटेवर इंडिया लिहिलेले आहे. मग त्याही नोटा सरकारला बंद कराव्या लागतील. मग आपण पुन्हा रांगेत उभा राहायचे. तिसऱ्या नोटबंदीला सामोरे जायचे.

पाठिमागील काही दिवसांपासून इंडिया की भारत यावरुन जोरदार चर्चा सुरु आहे. केंद्र सरकार इंडिया ऐवजी भारत हे अधिकृत नाव करण्याच्या विचारात असल्याचे दिसते. जी-20 परिषदेतील मेजवानीच्या निमंत्रण पत्रिकेवरील प्रेंसिंडेट ऑफ भारत हा उल्लेख वगळता अद्यापपर्यंत तरी तसे अधिकृतरित्या तरी दिसून आले नाही. मात्र, या मुद्द्याची चर्चा मात्र जोरदार सुरु आहे. दरम्यान, सर्वात प्रथम इंडिया हा शब्द बदलून त्या ठिकाणी भारत हा शब्द घ्यावा अशी मागणी सर्वात प्रथम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सरसंघचालक मोहन भागवत यांनी केली होती. त्यानंतर मोदी सरकार त्या दिशेने पावले टाकत असल्याचे दिसते.