दिल्लीचं The Indira Gandhi International Airport कोरोना संंकटकाळात जगातील सर्वात सुरक्षित विमानतळांच्या यादीत दुसर्‍या स्थानी
Coronavirus scanning at an airport (Photo Credit: PTI)

दिल्लीचं इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (The Indira Gandhi International Airport)  हे COVID Pandemic दरम्यान जगातलं दुसर्‍या क्रमांकाचं सुरक्षित विमानतळ ठरलं आहे. सिंगापूरच्या Changi Airport पाठोपाठ दिल्लीच्या IGI चा नंबर लागतो. दरम्यान यामधील अजून एक उल्लेखनीय बाब म्हणजे सिंगापुरपेक्षा अवघ्या 1 पॉईंटच्या कमतरतेमुळे दिल्लीचं अव्वल स्थान हुकलं आहे. हा सर्वात सुरक्षित विमानतळांचा क्रम the barometer च्या अहवालानुसार लावण्यात आला आहे. COVID 19 चा धोका किराणामाल खरेदी, खाण्यासाठी बाहेर पडणं यापेक्षा Air travel मध्ये कमी; Harvard च्या संशोधकांचा दावा.

‘Safe Travel Barometer’ नुसार, दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळाला 4.6 गुण आहेत तर सिंगापुरच्या विमानतळाला 4.7 गुण आहेत. हे गुण 5 पैकी देण्यात आलेले आहे. त्यामुळे आता कोविड 19 संकटामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने हेल्थ प्रोटोकॉल पाळण्याच्या अनुषंगाने दिल्ली सुरक्षित विमानतळ ठरलं आहे. कोविड 19 चा हेल्थ आणि सेफ्टी प्रोटोकॉल पाहता Safe Travel Barometer जगातील 200 विमानतळांची पाहणी करतात. यामध्ये आरोग्य संकटाच्या काळात विमानतळावर सुरक्षा, खबरदारी कशी घेतात? स्वच्छता कशी पाळली जाते? हे पाहिलं जात.

DIAL च्या माहितीनुसार, भारतामध्ये आता दिल्ली हे कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामधील सर्वात कमी धोकादायक विमानतळ आहे. दिल्ली विमानतळावर आरटी पीसीआर टेस्टिंग लॅब, युवी बेस्ट डिसइंफेक्शन प्रोसेस, touchless initiatives,AIR SUVIDHA portal मुळे कमीत कमी त्रासदायक अनुभव भारतामध्ये येणार्‍या इंटरनॅशनल पॅसेंजर्सना मिळतो. Smart City Index 2020: स्मार्ट सिटी इंडेक्सच्या ग्लोबल रँकिंगमध्ये भारतीय शहरांची मोठी घसरण; Singapore ने पटकावला पहिला क्रमांक, जाणून घ्या Top-10 शहरे.

दिल्ली व्यतिरिक्त चीनचं Chengdu Shuangliu Airport आणि जर्मनीचं Frankfurt Airport देखील 4.6 गुणांसह दुसर्‍या क्रमांकावर आहे. दरम्यान बॅरोमीटर हे जगातील सर्वात मोठं आणि सर्वाधिक विस्तृत टूल आहे. यामुळे प्रवाशांच्या आरोग्य आणि सेफ्टी प्रोटोकॉल यांचं मोजमाप घेता येतं.