दिल्ली: उन्नाव बलात्कार प्रकरणात माजी भाजप आमदार कुलदीप सेंगर दोषी; शशी सिंह यांची निर्दोष सुटका
Kuldeep Singh Sengar (Photo Credits: IANS)

उन्नाव बलात्कार प्रकरणातील (Unnao Rape Case) आरोपी माजी भाजप आमदार कुलदीप सैंगर (Kuldeep Sengar) याला दिल्ली (Delhi) च्या तीस हजारी कोर्टाने (Tis Hazari Court)  दोषी जाहीर केले आहे, तर महिला आरोपी शशी सिंह (Shashi Singh) हिची कोर्टाने निर्दोष मुक्ती केली आहे. शशी या अल्पवयीन मुलीला कुलदीप यांच्याकडे घेऊन गेल्या असल्याचा आरोप होता. या खटल्यातील पुढील सुनावणी 19 डिसेंबर पर्यंत पुढे ढकलण्यात आली असल्याचे समजते.

उत्तर प्रदेशातील उन्नाव बलात्काराने दोन वर्षांपूर्वी देश हादरून निघाला होता, अलीकडेच या प्रकरणी कोर्टात सुनावणीसाठी जात असणाऱ्या मुलीला जाळण्याचा प्रयत्न झाला होता, दुर्दैवाने या मध्ये पीडिता 90 टक्के भाजली गेली होती, दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता पीडितेला हृदयविकाराचा झटका आल्याने तिचा मृत्यू झाला होता, यानंतर याप्रकरणात जलद सुनावणी व्हावी अशी मागणी केली जात होती. आज अखेरीस तब्बल दोन वर्षांनंतर हा निकाल समोर आल्याने जनसामन्यांमधून याचे कौतुक केले जात आहे.

ANI ट्विट

दरम्यान, 2017 साली या बलात्कारांनंतर सीबीआय तर्फे चार्जशीट दाखल करून एप्रिल 2018 मध्ये कुलदीप सिंह यांना अटक करण्यात आली होती. या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला नऊ दिवस वेगवेगळ्या ठिकाणी लपवण्यात आले होते असे तपासात आढळून आले होते. या तपासावरूनच कुलदीप यांच्यावर बलात्कार, अपहरण आणि पॉस्को ऍक्ट अंतर्गत आरोप लागवण्यात आले होते. हे आरोप सिद्ध झाल्याने आज त्यांना कोर्टाकडून दोषी जाहीर करण्यात आले आहे.