प्रकाश जावडेकर  'Hyundai Kona' इलेक्ट्रिक कार मधून पोहचले  हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेमध्ये!
Prakash Javadekar (Photo Credits: ANI)

दिल्लीमध्ये आज (18 नोव्हेंबर) पासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. सकाळी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) इलेक्ट्रिक कारने संसदेमध्ये पोहचले. इलेक्ट्रीक कार वाढत्या प्रदुषणावर उत्तम पर्याय असेल भविष्यात सरकार इलेक्ट्रिक कारचा वापर वाढवणार असल्याचं प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. तसेच संसद परिसरात पोहचल्यानंतर भारतीयांनीही सार्वजनिक वाहनं आणि इकेल्ट्रिक कारचा वापर करून प्रदूषण विरोधी लढ्यामध्ये योगदान द्यावं असं आवाहन प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे. हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु; नागरिकत्व सुधारणा सहित 50 प्रलंबित विधेयकांवर चर्चा होण्याची शक्यता

दिल्लीमध्ये सध्या प्रदूषण ही एक मोठी समस्या बनली आहे. घसरलेलं तापमान आणि त्यासोबत भाताच्या शेतीमध्ये अवशेष जाळण्यासाठी लावण्यात आलेली आग यामुळे धूर आणि धूकं एकत्र येऊन 'स्मॉग' निर्माण झालं आहे. त्यामुळे दिल्लीतील जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान दिल्लीतील प्रदुषणामध्ये इंधनाच्या गाडीमुळे होणारा धूर टाळण्यासाठी इलेक्ट्रिक कार हा उत्तम पर्याय आहे.

इलेक्ट्रीक कार द्वारा पोहचले प्रकाश जावडेकर

प्रकाश जावडेकर यांच्याप्रमाणेच प्रदूषणावर मात करण्यासाठी भाजपा खासदार मनोज तिवारी देखील सायकलवरून संसदेमध्ये पोहचले. सध्या दिल्लीच्या प्रदूषणावर मात करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहेत पण त्याला जनतेचीदेखील जोड हवी असं मत तिवारी यांनि व्यक्त केलं आहे.

यंदा 18 नोव्हेंबर ते 13 डिसेंबर या कालावधीत हे हिवाळी अधिवेशन घेण्यात येणार आहे. यावेळी नागरिकत्व (सुधारणा) विधेयकासहित अन्य 50 प्रलंबित विधायकांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. याशिवाय कॉर्पोरेट कर कमी करणे आणि ई-सिगारेटवर बंदी घालणे या संबंधित वटहुकमाला कायद्याचे रूप देण्याचा प्रस्ताव देखील या चर्चेत मांडला जाईल.