दिल्ली: सुकवलेल्या गोणपाटांमधून करोडो रुपयांच्या हेरॉइनची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

देशात अंमली पदार्थांचे सेवन करण्यावर सरकारने बंदी घातली आहे. तरीसुद्धा चोरीछुप्या रितीने अंमली पदार्थांची तस्करी करण्यात येते. असाच एक प्रकार दिल्लीतील (Delhi) पोलिसांच्या हाती लागला असून दोघांना अंमली पदार्थांची तस्करी करताना पकडले आहे.

अफगाण (Afghan) येथून नवी मुंबईच्या (Navi Mumbai) दिशेने एका ट्रकमध्ये जवळजवळ 260 सुकवलेल्या गोणपाटांमधून 130 किलोचे हेरॉइनची तस्करी केली जात होती. तर दिल्ली पोलिसांनी या ट्रकची प्रथम तपासणी केली असता फक्त सुकवलेली गोणपाट असल्याचे सांगण्यात आले. परंतु पोलिसांनी अधिक कसून चौकशी केली असता त्या सुकवलेल्या गोणपाटांमधून हेरॉइनची तस्करी करण्यात येत असल्याचे सत्य समोर आले आहे. या जप्त करण्यात आलेले हेरॉइन 330 किलो पर्यंत असून त्याची किंमत 1320 करोड रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

(दिल्ली: 5 हजार कोटींपेक्षा अधिक किंमत असलेल्या हेरॉईनची रिकाम्या असलेल्या पोत्यांमधून तस्करी, पोलीस चक्रावले)

या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. तर गेल्या आठवड्यातसुद्धा अशाच प्रकारे हेरॉइनची तस्करी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. तेव्हा दिल्ली पोलिसांनी 5 हजार कोटींपेक्षा अधिक किंमत असलेले हेरॉइन जप्त केले होते.