शेतकरी आंदोलनावर ट्विट करणाऱ्या Greta Thunberg विरोधात दिल्ली पोलिसांकडून FIR दाखल
Greta Thunberg (Photo Credits: IANS)

शेतकरी आंदोलनावर ट्विट करणारी पर्यावरण अॅक्टीव्हिस्ट ग्रेटा थनबर्ग (Greta Thunberg) विरुद्ध दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) एफआयआर (FIR) दाखल केली आहे. बुधवारी सकाळी ग्रेटा थनबर्ग ने शेतकऱ्यांबद्दल चिंता व्यक्त करत एक ट्विट केले होते. त्यात तिने म्हटले होते की, आम्ही भारतीय शेतकऱ्यांच्या आंदोलनात त्याच्यासोबत एकत्रितपणे उभे आहोत. त्यावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून तीव्र प्रतिक्रीया देण्यात आली. (Farmer Protest in India: शेतकरी आंदोलनाचा मुद्दा परदेशात गाजला; पॉप स्टार रिहाना नंतर ग्रेटा थनबर्गनेही केलं शेतकऱ्यांचं समर्थन)

ग्रेटा थनबर्ग हिचे ट्विटचा सीएनएन वेबसाईटवर एक बातमीत उल्लेख करण्यात आला. ज्यात लिहिले होते की, "आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांशी पोलिसांचा संघर्ष असल्याने भारतातील नवी दिल्लीभोवती इंटरनेटसेवा बंद करण्यात आली आहे."

ग्रेटा थनबर्ग ट्विट:

पर्यावरण आणि हवामान बदल या क्षेत्रात काम करणाऱ्या ग्रेटा थनबर्ग आणि अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्या भाचीसह आंतरराष्ट्रीय समुदायातील अनेकांनी केंद्राच्या नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.

यानंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यापूर्वी आणि त्याबद्दल कोणतीही टिपण्णी करण्यापूर्वी तथ्यं जाणून घेतली पाहिजेत. तसंच सोशल मीडियावर हॅशटॅग आणि खळबळजनक टिपण्णी करणे योग्य नाहीच आणि ते जबाबदारपणाचे लक्षणही नाही.