दिल्ली महापालिका (Municipal Corporation of Delhi) सभागृह गुरुवारी सकाळी सुरु झाल्यानंतर पुन्हा एकदा पाचव्यांदा स्थगित करण्यात आले. पालिका (MCD) सभागृहात आम आदमी पार्टी (AAP) आणि भाजप (BJP) यांचे नगरसेवक आमनेसामने आल्याने दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी झाली. प्रचंड गोंधळामुळे कामकाज करणे अशक्य बनले. त्यातच आप आणि भाजपच्या महिला नगरसेविकांनी एकमेकींच्या अंगावर धावून जात जोरदार हाणामारी (Women Corporators Clash) करण्यास सुरुवात केली. या हाणामारीचा व्हिडिओ वृत्तसंस्था एएनआयने आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे.

दिल्ली महापालिका सभागृह काल म्हणजेच बुधवार (22 फेब्रुवारी) पासून आज सलग दुसऱ्या दिवशी पाचव्यांदा स्थगित करण्यात आले आहे. दोन्ही बाजूच्या सदस्यांनी वारंवार गोंधळ घातला. कामकाजात वारंवार व्यत्यय आणला. इतका की, व्हिडिओत उपलब्ध दृश्यांनुसार नगरसेवकांनी मतपेठ्या सभागृहातील खुल्या हौदामध्ये फेकल्या. काही नगरसेवक परस्परांमध्ये हाणामारी करताना आढळून आले. ज्याचा व्हिडिओ पाहायला मिळतो. (हेही वाचा, AAP On EC: निवडणूक आयोगाचा आदेश ऑपरेशन लोटसचा विस्तार आहे, प्रीती शर्मा मेनन यांची प्रतिक्रिया)

सभागृहात गुप्त मतदान पद्धती असताना नगरसेवक मोबाईलच्या माध्यमातून मतपत्रिकांचे फोटो काढत असल्याचा आरोप भाजपने केला. त्यावरुन मोठा गोंधळ निर्माण झाला. स्थायी समिती सदस्यांच्या निवडणुकीदरम्यान हा सर्व प्रकार घडला. हा सर्व प्रकार म्हणजे गुप्त मतदान पद्धतीचा भंग आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नव्याने मतदान घ्यावे एशी मागणी भाजपने केली आहे.

सभागृहाचे कामकाज तहकूब केले जात असताना, आपचे नेते सौरभ भारद्वाज यांनी भाजपवर निशाणा साधला आणि ते म्हणाले, "भाजप नगरसेवक स्थायी समितीच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सर्व निवडणुका पहिल्याच बैठकीत व्हाव्यात असे सांगितले होते. त्यामुळे पहिली बैढक आज आहे. परिणामी आम्हाला निवडणुका हव्या आहेत. आज म्हणजे आजच, मग ते रात्री असो किंवा सकाळी कधीही. ते पुढे म्हणाले, भाजपला जाणीवपूर्वक स्थायी समितीची संपूर्ण निवडणूक पुन्हा घ्यायची आहे. अशा प्रकारे ही प्रक्रिया कधीच संपणार नाही. एमसीडी सचिवांनी असेही म्हटले आहे की त्यांच्याकडे फक्त 245 मतपत्रिका आहेत, आणि आम्ही संपूर्ण निवडणूक घेऊ शकत नाही. AAP वर प्रत्युत्तर देताना, भाजपचे प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी आपला "अराजकतावादी आक्रमक पक्ष" म्हटले आहे.