Lockdown: राहुल गांधी यांनी घेतली परप्रांतीय कामगारांची भेट; फुटपाथवर बसून केली आत्मीयतेने विचारपूस (Photo)
राहुल गांधी (Photo Credits ANI)

कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल (Rahul Gandhi) गांधी यांनी आज प्रवासी कामगारांची (Migrant Labourers) भेट घेतली. दिल्लीतील (Delhi) सुखदेव विहार (Sukhdev Vihar) उड्डाणपुलाजवळ शनिवारी काँग्रेस नेत्यांनी कामगारांची भेट घेतली. राहुल गांधी यांनी फुटपाथवर बसून कामगारांची आत्मीयतेने विचारपूस केली आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. सोबतच त्यांनी भारतीय युवा कॉंग्रेस आणि दिल्ली प्रदेश कॉंग्रेस कमिटीला, दिल्लीत अडकलेल्या परप्रांतीय कामगारांच्या सुरक्षित परताव्याची व्यवस्था करण्यास सांगितले आहे. सध्या लॉक डाऊनमुळे अनेक राज्यांमधून कामगार आपापल्या घरी परतत आहेत. काही ठिकाणी वाहतुकीची व्यवस्था न झाल्याने मोठ्या कष्टाने हे कामगार पायी आपल्या गावाची वाट तुडवत आहेत.

एएनआय ट्वीट- 

कामगारांच्या प्रश्नांबाबत राहुल गांधी मोदी सरकारवर सतत टीका करण्याचा प्रयत्न करत आहेत. लॉकडाऊन दरम्यान राहुल गांधी यांनी सरकारच्या अनेक निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आज राहुल गांधी यांनी सुखदेव विहार उड्डाणपुलाजवळ फुटपाथवर बसून कामगारांचे प्रश्न जाणून घेतले. त्यानंतर कॉंग्रेस पक्षाने शनिवारी असा आरोप केला आहे की, हरियाणाच्या अंबालाहून यूपीच्या झाशी येथे जाणाऱ्या स्थलांतरित कामगारांची राहुल गांधी यांनी भेट घेतल्यानंतर थोड्याच वेळात दिल्ली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. (हेही वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटीच्या पॅकेज बाबत पुनर्विचार करावा- राहुल गांधी)

सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक कामगारांना पैसे, नोकरी व अन्न याबाबत संकटाचा सामना करावा लागत असल्याने, त्यांना झाशी व आसपासच्या गावी परत जाणे भाग पडले. कॉंग्रेस सूत्रांनी असा दावा केला आहे की, या परप्रांतीयांना प्रतिबंधात्मक नजरकैदेत ठेवण्यात आले होते, मात्र पोलिस कर्मचाऱ्यांनी असा दावा केला आहे की, त्यांना तसे करण्यास 'वरुन दिशानिर्देश' आहेत. राहुल गांधींनी स्थलांतरित कामगारांना रोखण्यासाठी, स्थलांतर कामगारांच्या हितासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी केंद्रातील मोदी सरकारकडे केली आहे.