दक्षीण दिल्लीतील शाहदरा (Shahdara ) जिल्ह्यातील फार्श बाजार (Farsh Bazar) परिसरात शनिवारी सकाळी एका 57 वर्षीय व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या (Delhi Businessman Murder) करण्यात आली. पीडित सुनील जैन (Businessman Sunil Jain) यमुना क्रीडा संकुलात फिरून आपल्या मित्रासोबत स्कूटरवरून घरी परतत असताना दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी त्याच्यावर अनेक गोळ्या झाडल्या. ज्यात त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये हाती आलेली धक्कादायक माहिती अशी की, व्यावसायिक जैन आणि हल्लेखोर यांच्यात कोणतेही वैर नव्हते. केवळ ओळख चुकल्याने हल्लेखोरांनी जैन यांच्यावर गोळीबार केला. हल्लेखोरांकडून झालेली नजरचूक जैन यांच्या जीवावर बेतली आहे. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
'हाच आहे.. ठोका याला'
सुनील जैन यांचा मित्र सुमीत यांनी ही आपल्या मित्राची हत्या डोळ्यांनी पाहिली. त्यांनी पोलिसांना सांगितले की, हल्लेखोरांनी सुमीतकडे येत त्याला फोन फेकून दिल्याचा दावा केला. त्यानंतर त्यांनी त्याच्याकडे 'विराट'च नावाच्या व्यक्तीबाबत विचारले. यावर सुमित याने मध्यस्थी करत सांगितले की, तो विराट नावाच्या कोणत्याच व्यक्तीला ओळखथ नाही. इतक्यात हल्लेखोरांपैकी एक असलेल्या व्यक्तीने अरे हाच आहे तो.. ठोका याला.. (येही है वो.. ठोको) असे म्हटले. त्यानंर हल्लेखोरांनी सुनील जैन यांच्यावर आठ गोळ्या झाडल्या. ज्यात त्यांचा मृत्यू झाला. (हेही वाचा, Delhi Crime News: शौचालयात पाणी टाकण्यावरुन वाद, शेजाऱ्याची भोसकून हत्या; व्यावसायिकाला घातल्या गोळ्या, दिल्ली हादरली)
घटन आणि पार्श्वभूमी
कृष्णा नगर येथील रहिवासी असलेल्या सुनील जैनचा भांडी बनवण्याचा व्यवसाय होता. त्याचे कोणाशीही वैर नसल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले. आरोपी अजूनही फरार आहेत आणि त्यांची ओळख पटवण्याचे आणि त्यांना अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे कृष्णा नगर आणि शाहदरा जिल्ह्यातील रहिवाशांना धक्का बसला आहे. हे प्रकरण जसजसे पुढे सरकत आहे तसतशी वाढीव सुरक्षा आणि जलद तपासाची मागणी वाढत आहे. (हेही वाचा, Triple Murder in South Delhi: दक्षिण दिल्ली येथे तिहेरी हत्याकांड; आई, वडील आणि मुलीचा मृत्यू; नेब सराय येथील घटना)
पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी
दरम्यान, पोलिसांनी सर्व साक्षी आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे चौकशी सुरु केली आहे. हल्लेखोरांनी नजरचुकीने हा हल्ला केला असावा असा पोलिसांना संशय आहे. हल्लेखोरांना वेगळ्याच कोणत्यातरी व्यक्तीस ठार मारायचे होते. मात्र, ओळख पटविण्यात त्यांची गल्लत झाली आणि त्यांनी सुनील जैन यांच्यावर गोळीबार केला. पोलीस उपायुक्त (शाहदरा) प्रशांत गौतम म्हणाले की, सर्व बाजूंनी तपास केला जात आहे आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचे तपासले जात आहे. दिल्लीत दोन लोकांची हत्या केल्याप्रकरणी गेल्या महिन्यात अटक करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलाचे विराट नावाचे वडील होते, असे अधिकाऱ्यांनी सांगिले. तथापि, नेमबाज शोधत असलेले हेच 'विराट' आहेत की नाही हे अद्याप अस्पष्ट आहे. हल्लेखोरांनी 9mm आणि 7.61 mm पिस्तूलचा वापर केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.