दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 साठी मतदान प्रक्रिया सध्या सुरू आहे. मतदान केंद्रांवर आज म्हणजेच 5 फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजता सुरु झालेले मतदान मतदान संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहतील. त्यानंतर मतदान संपल्याची घोषणाच होताच काहीच वेळात म्हणजे सायंकाळी 6.30वाजता एक्झिट पोलचे अंदाज जाहीर होतील. एक्झिट पोलबाबत निवडणूक आयोगाने मार्गदर्शक तत्वे लागू केल्याने त्याच्या आचरण प्रणाली, प्रसारण आणि प्रकाशनावर कडक निर्बंध आहेत. असे असले तरी विशिष्ट वेळेनंतर जाहीर होणारे एक्झीट पोल्स कोठे पाहायचे हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ही माहिती तुमच्या कामाची आहे.
एक्झिट पोलबाबत निवडणूक आयोगाचे मार्गदर्शक तत्वे
भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) मतदानाच्या वेळेत एक्झिट पोलचे आचरण, प्रकाशन आणि प्रसारण यावर कडक नियम लागू केले आहेत. 3 फेब्रुवारी 2025 रोजी जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, निवडणुकीच्या दिवशी सकाळी 7 ते संध्याकाळी 6.30 वाजेपर्यंत प्रिंट, इलेक्ट्रॉनिक माध्यमे किंवा इतर कोणत्याही माध्यमातून एक्झिट पोलचा प्रसार करण्यास मनाई आहे.
एक्झिट पोल कुठे पहावे?
निवडणूक आयोगाने घालून दिलेले निर्बंध उठल्यानंतर अॅक्सिस माय इंडिया, सीव्होटर, आयपीएसओएस, जन की बात आणि टुडेज चाणक्य यासारख्या आघाडीच्या मतदान संस्था त्यांचे अंदाज जाहीर करतील. हे एक्झिट पोल्स जरी, मतदारांच्या पसंतींचे लवकर संकेत देत असल्या तरी, त्या अंतिम निवडणूक निकाल निश्चित करत नाहीत. (हेही वाचा, Delhi Exit Poll Results 2025: दिल्ली विधानसभा एक्झिट पोल निकाल; आप, भाजप आणि काँग्रेस यांच्यात कोण कोणावर भारी? घ्या जाणून)
मतदार आणि राजकीय उत्साही एक्झिट पोल खालील प्रकारे पाहू शकतात:
-
- लेटेस्टली इंग्रजी ब्लॉगवरील लाईव्ह अपडेट्स
- विविध प्रसारमाध्यमांच्या संकेतस्थळांवरील दिल्ली निवडणूक पेज
- डीएनए इंडिया न्यूज आणि टाईम्स न्यूज सारख्या वृत्तवाहिन्यांवर थेट प्रक्षेपण
डिएनए एक्झीट पोल्स निकाला येथे पाहू शकता
टाईम्स नाऊ एक्झीट पोल्स निकाल येथे पाहू शकता
मतदार मतदानाचा ट्रेंड
भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI) मते, दुपारी 1 वाजेपर्यंत, एकूण मतदान 33.31% होते. विविध मतदारसंघांमध्ये झालेले मतदान खालीलप्रमाणे:
ईशान्य दिल्लीत सर्वाधिक 39.51% मतदान झाले
मध्य दिल्लीत सर्वात कमी29.74% मतदान झाले
महत्त्वाची लढाई: आप, भाजप आणि काँग्रेस
दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 ही तीन प्रमुख पक्षांमध्ये एक महत्त्वाची स्पर्धा आहे:
दरम्यान, या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्ष (आप) पुन्हा एकदा सत्ता टिकवून ठेवण्याचे ध्येय ठेवत आहे. तर, भारतीय जनता पक्ष (भाजपा) सुमारे २७ वर्षांनंतर पुनरागमन करण्याचा आणि पुन्हा नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे. एकेकाळी दिल्लीच्या राजकारणावर वर्चस्व गाजवणारा काँग्रेस राज्यात आपले अस्तित्व पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न करीत आहे. मतदान सुरू असताना, सर्वांचे लक्ष एक्झिट पोलच्या निकालांवर असेल, जे मतमोजणीपूर्वी निवडणूक निकालाची झलक देतील.