Delhi Exit Poll Results 2025 | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

AAP vs BJP vs Congress In Delhi: दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 साठी (Delhi Exit Polls 2025) आज (बुधवार, 5 फेब्रवारी 2025) एकाच टप्प्यात मतदान पार पडले. सकाळी 7.00 वाजता सुरु झालेले मतदान सायंकाळी 6.00 वाजता संपले. त्यानंतर अवघ्या काहीच वेळात म्हणजेच सायंकाळी 6.30 नंतर निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, एक्झिट पोलचे निकाल (Delhi Exit Polls 2025) जाहीर करण्यात आले. विविध वृत्तवाहीण्या आणि संस्थांनी जाहीर केलेल्या एक्झिट पोल्सच्या अंदाजामध्ये 8 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या अधिकृत मतमोजणीपूर्वी संभाव्य निकालाचे संकेत मिळाले आहे. अर्थात हे एक्झिट पोल्सचे अंदाज म्हणजे निवडणुकीचा निकाल नव्हे. अधिकृत निकाल मतमोजणीनंतर 8 फेब्रुवारीलाच असेल. पण, तोवर जनतेच्या मनात काय चालले आहे याचा अंदाज एक्झिटपोल्स निकाल पाहून बांधता येतो. विविध संस्थांचे निकाल खालील प्रमाणे:

दिल्ली निवडणूक 2025: तिरंगी लढत

दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 मध्ये आम आदमी पक्ष (AAP), भारतीय जनता पक्ष (BJP) आणि काँग्रेस (Congress) यांच्यात अत्यंत चुरशीची लढत झाली. जी तिरंगी होती. 70 विधानसभा जागा जिंकण्यासाठी, राष्ट्रीय राजधानीत पुढील सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही एका पक्षाला किंवा युतीला किमान 36 जागा मिळवाव्या लागतील. तरच बहुमताचा आकडा पार करणे शक्य होणार आहे. (हेही वाचा, Delhi Assembly Elections 2025 Exit Polls: दिल्ली विधानसभा निवडणूक एक्झिट पोल्स कोठे पाहाल?)

एक्झिट पोल निकाल: कोणाची आघाडी, कोणास बहुमत?

एक्झिट पोल डेटा येत असताना, सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये आप आणि भाजप यांच्यात जवळची स्पर्धा असल्याचे दिसून येते, ज्यामध्ये काँग्रेस पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत आहे. ८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या अंतिम मतमोजणीमुळे विजेता कोण आहे हे निश्चित होईल, तर राजकीय विश्लेषक आणि पक्षाचे रणनीतीकार आधीच मतदार ट्रेंड आणि संभाव्य जागा वाटपाचे विश्लेषण करत आहेत.

चाणक्य स्ट्रॅटेजीज एक्झिट पोल एक्झिट पोल 2025 चे निकाल (Chanakya Strategies Exit Poll Exit Poll 2025 Results)

भाजपा: 39-44

आप: 25-28

काँग्रेस : ​​2-3

मॅट्रीझ एक्झिट पोल 2025 चे निकाल (Matriz Exit Poll 2025 Results)

भाजपा+ : 35-40 (46%)

आप : 32-37 (44%)

काँग्रेस : 0-1 (8%)

पीपल्स एक्झिट पोल 2025 चे निकाल (People's Exit Poll 2025 Results)

आप: 25-29

बीजेपी: 40-44

काँग्रेस : ​​0-2

JVC एक्झिट पोल एक्झिट पोल 2025 चे निकाल (JVC Exit Poll Exit Poll 2025 Results)

बीजेपी: 39-45

आप: 22-31

काँग्रेस : ​​00-02

अन्य: 00-01

निवडणुकीच्या निकालांचा अंदाज घेण्यासाठी मतदानानंतर लगेचच मतदारांचा अभिप्राय गोळा करून सर्वेक्षण संस्था एक्झिट पोल करतात. हे अंदाज अंतिम मतमोजणीपूर्वी जनतेच्या भावना जाणून घेण्यास मदत करतात. तथापि, एक्झिट पोल्सचा मागील इतिहास पाहता ते अनेकदा आपला निकाल अचूकपणे सांगू शकले नाहीत. त्यामुळे एक्झिट पोल्सचा दिल्लीबातचा निकालही अनिश्चित आहे. परिणामी 8 फेब्रुवारी रोजी होणारी प्रत्यक्ष मतमोजणी निर्णायक घटक बनली.