Rajnath Singh | (Photo Credits-Facebook)

देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यसभा सभागृहात भारत-चीन सीमावादाबाबत (India- China Border Dispute) महत्त्वपूर्ण माहिती गुरुवारी (11 फेब्रुवारी) दिली. राजनाथ सिंह (Rajnath Singh) म्हणाले, उभय देश सीमावादावर महत्त्वपर्ण चर्चा करत आहे. लद्दाख आणि लगतच्या सीमांवर (लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोल) भारत पूर्ण ताकदीने उभा आहे. भारताला चीनवर प्रभुत्व मिळवता आले आहे. तसेच, चर्चेवेळी भारताने काहीही गमावले नसल्याचेही राजनाथ सिंह म्हणाले.

पुढे बोलताना राजनाथ सिंह यांनी सांगितले की, भारतीय लष्कराचे जवान सर्वाभौमत्व असलेल्या अतिशय दुर्गम ठिकाणी पाय रोवून उभे आहेत. जीनला तोडीस तोड प्रत्युत्तर देण्यासाठीही भारताने काऊंटर डिप्लॉयमेंट केले आहे. भारताचे सैन्य या स्थितीवर अत्यंत कौतुकास्पद कामगिरी करते आहे. राजनाथ सिंह यांनी सांगितले की, दोन्ही देशांमध्ये डिसइंगेजमेंट प्रक्रिया सुरु झाली आहे. दोन्ही देश आपापले सैन्य पैंगॉन्ग लेक पासून मागे घेत आहेत.

राजनाथ सिंह यांनी सांगितले की, चीनसोबतच्या चर्चेवेळी भारताने आपले मत स्पष्ट केले. चीनसमोर तीन अटी ठेवल्या. पहिली अट अशी की, दोन्ही पक्षांकडून LAC मान्य करावी आणि त्याचा आदर करावा. दुसरी अट- कोणत्याही पक्षाकडून यात बदल करण्याचा एकतर्फी प्रयत्न करु नये. आणि तिसरी अट अशी की, सर्व समझोते दोन्ही पक्षांनी मिळून करावेत. (हेही वाचा, India-China Border Tensions: भारत-चीन तणावाप्रकरणी शरद पवार म्हणाले- 1962 मधील घटना लक्षात ठेवा; राष्ट्रीय सुरक्षिततेच्या मुद्द्यावरुन राजकरण योग्य नाही)

राजनाथ सिंह यांनी सांगितले की, संघर्ष असलेल्या क्षेत्रामध्ये डिस्इंगेजमेंटसाठी भारताची भूमिका अशी आहे की, 2020 च्या फॉरवर्ड डिप्लॉयमेंटमध्ये जी एकमेकांच्या अगदी जवळ आहेत. त्यांनी दूर व्हावे. दोन्ही सैन्यदलांनी पुन्हा आपापल्या ठिकाणी पोहोचावे. सातत्याने सुरु असलेल्या चर्चेमध्ये समझोता झाला आहे. दोन्ही सैन्यांनी मागे जात आपापल्या मुळ ठिकाणी जाण्यावर सहमती झाली आहे.