केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांच्याकडे गेल्या काही काळापासून शहीद जवानांच्या परिवाराला मिळणाऱ्या आर्थिक निधीत वाढ करावी अशी मागणी करण्यात येत होती. यावर आता राजनाथ सिंह यांनी निर्णय घेतला असून युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या परिवाराला देण्यात येणाऱ्या आर्थिक निधीत 4 पटीने वाढ करण्यात येणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. ही मदत पेंन्शन, सेनेचा सामूहिक वीमा, सेना कल्याण निधी आणि एकूण रक्कम यांच्या व्यतिरिक्त देण्यात येते.
शनिवारी अधिकाऱ्यांनी असे म्हटले की, आर्थिक सहयोग युद्धात शहीध झालेल्या सैनिक कल्याण निधी अंतर्गत आर्थिक मदत दिली जाणार आहे. सध्या युद्धात शहीद किंवा 60 टक्क्यांपेक्षा अपगंत्व आलेल्या जवानांसह अन्य श्रेणीमधील सैनिकांना 2 लाख रुपयापर्यंत आर्थिक मदत केली जाते. 60 टक्क्यांपेक्षा कमी अपगंत्व आलेल्या जवानांना 1 लाखापर्यंत मदत करण्यात येते.
संरक्षण मंत्रालयाच्या एका प्रवक्ताने असे म्हटले आहे की, राजनाथ सिंह यांनी युद्धात शहीद किंवा जखमी झालेल्या सर्व श्रेणीतील जवानांच्या परिवाराला आर्थिक सहाय्य निधी 2 लाख रुपयांवरुन 8 लाख रुपये करण्यात आली आहे.(बालाकोट एअरस्ट्राईक' चा व्हिडिओ जारी; पहा Indian Air Force ने कसा केला आतंकवाद्यांचा खात्मा)
तसेच मे महिन्यात पंतप्रधान पदी पुन्हा एका विराजमान झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी शहीद जवानांच्या मुलांबाळांबाबत एक महत्वपूर्ण निर्णय घेतला होता. यामध्ये नरेंद्र मोदी यांनी शहीद जवानांच्या मुलांना देण्यात येणाऱ्या स्कॉलरशिपबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय सशस्र दलामधील शहीद जवानांच्या मुलांसाठी सुरु करण्यात आलेल्या स्कॉलरशिप योजनेचा विस्तार केला आहे.
यापूर्वी स्कॉलरशिपअंतर्गत मुलांसाठी दोन हजार रुपये मिळत होते. तर आता त्यामध्ये वाढ करण्यात आली असूनत ती अडीच हजार रुपये करण्यात आली आहे. तसेच मुलींसाठी यापूर्वी 2250 रुपये देण्यात येत होते. मात्र त्यामध्ये वाढ करत तीन हजार रुपये स्कॉलरशिप मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.