बालाकोट एअरस्ट्राईक' चा व्हिडिओ जारी; पहा  Indian Air Force ने कसा केला आतंकवाद्यांचा खात्मा
IAF | Photo Credits wikimedia commons

पुलवामा मध्ये 14 फेब्रुवारीला सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला होता. या आत्मघाती हल्ल्यानंतर भारताने बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक करण्यात आला होता. आज (4 ऑक्टोबर) या हल्ल्याचा व्हिडिओ आज भारताच्या हवाई दलाने जारी केला आहे. या हल्ल्यामध्ये दहशतवादी तळ उद्धवस्त करण्यात आल्याचं आता समोर आलं आहे. बालाकोट हा भाग पाक व्याप्त कश्मीरमध्ये आहे. येथे जैश ए मोहम्मदच्या तळावर भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राईकच्या माध्यमातून हल्ला करण्यात आला आहे. एअर फोर्स चिफ मार्शल राकेश कुमार सिंह बहादुरिया( Rakesh Kumar Singh Bhadauria) यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली आहे.

भारतीय हवाई दलाने पाकव्याप्य कश्मीरमध्ये मुजफ्फराबाद, चकोटी, बालाकोटमधील अनेक परिसरात बॉम्ब हल्ले केले. 'मिराज 2000' या 12 लढाऊ विमानांनी दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला करत त्यांचे सर्व तळ नेस्तनाबूत केले होते. Pulwama Terror Attack ते Surgical Strike 2 चा घटनाक्रम,भारतीय वायुसेनेने उद्ध्वस्त केले दहशतवाद्यांचे अड्डे

 

ANI Tweet

 

पाकिस्तानच्या बालाकोट मध्ये भारतीय वायुसेने केलेल्या एअर स्ट्राईकला 'ऑपरेशन बंदर' असं म्हटलं होतं. पाकव्याप्त कश्मीर मध्ये घुसून वायुसेनेने विंग कमांडर अमित रंजन, स्क्वाड्रन लीडर राहुल बसोया, पंकज भुजडे, बीकेएन रेड्डी, शशांक सिंह यांनी आंतकवाद्यांना कंठस्नान घातले.