पाठिमागील पाच वर्षांपासून बेपत्ता असलेला आणि कुटुंबीयांच्या तक्रारीवरुन पोलीस दप्तरी मृत अशी नोंद झालेला 45 वर्षीय व्यक्ती चक्क जीवंत आढळला (Dead Man Found Alive) आहे. तो केवळ जीवंतच नव्हे तर विवाहबाह्य संबंधात (Extramarital Affair) असलेली महिला आणि चार मुलांसोबत दिल्ली (Delhi) येथे संसार सुखाने संसार करत असल्याचे आढळून आले आहे. पोलिसांनी सांगिले की, सदर व्यक्ती पाच वर्षांपासून बेपत्ता होता. त्याचा कोणताच ठावठिकाणा न लागल्याने त्याला मृत समजले जात होते. मात्र, तो दिल्ली येथे ट्रॅक्सी चालक (Taxi Driver) म्हणून काम करत आहे आणि याच शहरात राहात आहे.
पोलीस कारवाईच्या भीतीने पलायन
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेंद्र कुमार नावाचा हा व्यक्ती मुळचा उत्तर प्रदेश राज्यातील बागपत येथील सिंघावली अहिर येथील रहिवासी आहे. तो सन 2018 मध्ये बेपत्ता झाला होता. त्याच्यावर गुन्हेगारी आरोप होते. त्यावरुन त्याच्यावर आणि त्याच्या भावांवर अनेक गुन्हेही दाखल झाले होते. त्याच्याच गावातील एक गावकरी वेदप्रकाश यांनी दिलेल्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल झाला होता. (हेही वाचा, मेलेली व्यक्ती तुमच्या स्वप्नात येऊन तुमच्याशी बोलते? तर जाणून घ्या स्वप्न शास्त्र याबद्दल काय सांगते)
कुटुंबीयांकडून अपहरण आणि हत्येचा दावा
सिंघावली अहिर पोलीस स्टेशनचे प्रमुख जितेद्र सिंह यांनी सांगितले की, योगेंद्र कुमार याच्यावर भारतीय दंड संहिता कलम 375 (दुखापत करणे), 506 (गुन्हेगारी धमकी) अन्वये गुन्हे दाखल होते. गुन्हा दाखल झाल्याचे समजताच हा व्यक्ती बेपत्ता झाला. पुढचे प्रदीर्घ काळ शोध घेऊनही त्याचा ठावठिकाणा मिळाला नाही. त्याच्या कुटुंबाने पोलिसांना पत्र लिहून दावा केला होता की, कुमारची हत्या झाली आहे. ही हत्या गावकरी वेदप्रकाश, ज्याने त्याच्याविरुद्ध तक्रार दिली होती. त्यानेच केली आहे. कुमारच्या कुटुंबीयांनी प्रकाश याच्याविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी आपल्या पत्रात केली होती. पुढे कोर्टाच्या आदेशामुळे भारतीय दंड संहिता कलम 364 (अपहरण) आणि 302 (हत्या) अन्वये वेदप्रकाश याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र, सलग आठ महिने तपास केल्यानंतरही कुमार याची हत्या अथवा मृत्यू झाल्याची कोणताच पूरावा पोलिसांना मिळू शकला नाही. (हेही वाचा, Land Grab Case In Navi Mumbai: 70 लाखांची गोष्ट, मेलेला जिवंत केला; भूखंड लाटला अन् गायब झाला, घरातल्यांना पत्ताच नाही लागला; जाणून घ्या प्रकरण)
जामीनासाठी कोर्टात दाखल
दरम्यान, एके दिवशी अचानक एका जुन्या प्रकरणा जामीन मिळविण्यासाठी कुमार कोर्टात हजर झाला आणि पोलिसांना त्याचा ठावठिकाणा लागला. तो दिल्ली येथे असल्याचे आढळून आले. दिल्ली येथे तो ट्रॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करतो आणि बायको आणि चार मुलांसह राहतो. त्याने त्याची स्वत:ची ओळखही पुरती बदलली आहे. टीओआयने याबाबत वृत्त दिले आहे.
गावकऱ्यासोबत शत्रूत्व असल्याने स्थलांतर
पोलिसांनी केलेल्या चौकशीत, कुमार याने सांगितले की, त्याचे गावातील व्यक्ती वेदप्रकाश याच्यासोबत शत्रूत्व होते. त्यामुळे तो दिल्ली येथे गेला. तेथे त्याचे एका महिलेसोबत 2018 मध्ये विवाहबाह्य संबंध प्रस्थापीत झाले. दरम्यान, गावाकडे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. त्यामुळे तो दिल्ली येथे स्थलांतरीत झाला आणि महिलेसोबत राहू लागला. बरेच दिवस गावाकडे न गेल्यामुळे आपले अपहरण करुन हत्या झाली असावी, असे आपल्या कुटुंबाला वाटत असल्याचेही तो म्हणाला.
दरम्यान, कुमार याची गावाकडील पत्नी रिटा यांनी सागितले की, सन 2018 नंतर ते आमच्याशी बोलले नाहीत. आमच्याशी त्यांनी संपर्कही केला नाही. त्यामुळे पोलिसांनी तपास करुन सत्य शोधावे अशी आमची इच्छा होती.