प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

डायरेक्ट टू होम सर्विस म्हणजेच डीटीएच (DTH) सर्विस प्रोव्हाडर कंपनी D2H ने मल्टी टीव्ही (Multi TV) सेवा सुरु केली आहे. त्यामुळे ग्राहकांना आता घरात दोन टीव्ही असला तरीही केबलच्या एका कनेक्शनवरुन चॅनल पाहता येणार आहेत. ट्रायला डीटीएच कंपनकडून देण्यात येणाऱ्या सुविधेमुळे एनसीएफ लावत आहेत की नाही हे पाहायचे होते. परंतु कंपनीने डीटूएचची नवीन सेवा घेऊन आला आहे.

या सेवेअंतर्गत ग्राहकांना त्यांच्या घरात टीव्ही असल्यास प्रत्येक कनेक्शनसाठी 50 रुपये मोजावे लागणार आहेत. डीटीएचची ही सेवा अन्य केबल धारकांपेक्षा स्वस्त आहे. तर एअरटेल आणि टाटा स्काय केबलसाठी ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागतात.(हेही वाचा-मुंबई: किफायतशीर दरात टीव्ही पाहता यावा याकरिता मुंबईकरांची ‘केबल १९९ ओन्ली’ मोहीम)

मात्र आता केबल धारकांनी घरात दोन टीव्ही असल्यास एका केबलच्या कनेक्शनमधून चॅनल पाहता येणार आहे. त्यासाठी ग्राहकांना फक्त 50 रुपये शूल्क भरावे लागणार आहेत. त्यामुळे ग्राहक आपल्या आपल्या पसंतीचे चॅनल वेगवेगळ्या टीव्हीवर पाहू शकणार आहेत.