
टीव्ही वाहिनीच्या निवडीबाबत ट्राय (TRAI) ने जानेवारी 2019 पासून नवा नियम आणला आहे. मात्र त्याच्या अंमलबजावणीमध्ये त्रुटी असल्याने अनेक ग्राहकांचा खिसा कापला जात आहे. जागरुक मुंबईकरांनी याविरोधात मोहिम सुरू केली आहे. 'केबल 199 ओन्ली' (Cable 199 Only) असे या माहिमेचं नाव असून वाहिन्यांनी कमाल अडीच रूपये दर आकारावा आणि त्यापेक्षा अधिक दर आकारणार असाल तर जाहिराती दाखवू नये. असा 'केबल 199 ओन्ली' या मोहिमेचा पवित्रा आहे.चॅनल निवडीसाठी TRAI ची 31 मार्चपर्यंत मुदतवाढ; ग्राहकांसाठी खास 'बेस्ट फिट प्लॅन'ची सुविधा
ट्रायच्या नव्या वाहिनी निवडीच्या नियमांमुळे ग्राहकांना दरमहा पूर्वीपेक्षा अधिक पैसे देऊन वाहिन्यांची पॅकेजेस निवडावी लागत आहेत. त्यामुळे केबलचालक आणि ग्राहकांनीही याबाबत निषेध नोंदवला होता. आता काही मुंबईकरांनी एकत्र येऊन याविरूद्ध आवाज उठवला आहे.'केबल 199 ओन्ली च्या माध्यमातून ग्राहकांनी फ्री टू एअर वाहिन्यादेखील 50पैसे आकारून दाखवा. मात्र सशुल्क वाहिन्यांचे दर अडीच रूपयांपेक्षा अधिक नकोत. म्हणजे ज्या ग्राहकाला सार्या वाहिन्या हव्या आहेत त्यांनाही त्या कमाल साडेतीनशे रूपये दरमहा उपलब्ध होतील. तरीही अडीच रूपयांपेक्षा अधिक शुल्क आकारायचा असेल तर जाहिराती दाखवू नका असे निवेदन देण्यात आले आहे.
देशामध्ये 167 वाहिन्या पेड स्वरूपात मोफत सेवा देऊ शकतातमग इतर सशुक्ल वाहिन्या अल्पदरात सेवा का देऊ शकत नाहीत? असा प्रश्न मुंबईकर विचारत आहे. अधिकाधिक मुंबईकर या सेवेमध्ये समाविष्ट व्हावेत याकरिता cable199only@rediffmail.com यावर ई-मेल पाठवावा असं आवाहन करण्यात आलं आहे.