Cyclone Vayu: येत्या 24 तासांमध्ये गुजरातमध्ये 'वायू' चक्रीवादळ धडकण्याची शक्यता
Cyclone in Odisha (Photo credit: IANS)

गुजरातच्या (Gujrat) किनारपट्टीवर येत्या 24 तासांमध्ये 'वायू' हे चक्रीवादळ धडकण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात येत आहे. 130 ते 135 किमी प्रति तासाच्या वेगाने हे चक्रीवादळ पुढे सरकत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत सुरक्षेच्या दृष्टीने तातडीची उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच कोणतीही अनुचित घटना घडूनये म्हणू वीजसेवा, दूरसंचार सेवा आणि पिण्याचे पाण्याची सेवा सुरु ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

गुजरातमध्ये पुढील 13 जूनला हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. तेसच आपत्कालीन नियंत्रण कक्षेलाही सतर्क राहण्याचे निर्देश गुजरात प्रशासनाने दिले आहेत. एनडीआरएफच्या 26 टीम तैनात करण्यात आल्या असून गुजरात सरकारच्या मागणीनुसार आणखी 10 टीम लवकरच पाठवण्यात येणार आहेत. याव्यतिरिक्त भारतीय तटरक्षक दल, नौदल, सैन्यदल आणि हवाई दलालाही अलर्ट राहण्यास सांगण्यात आले आहे. तसेच हेलिकॉप्टर्समधूनही परिस्थितीची पाहणी सुरू करण्यात आली आहे. या चक्रीवादळाचा फटका गुजरातसोबतच महाराष्ट्रालाही बसण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने गृहमंत्रालयाने सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

तसेच हवामान खात्याने सौराष्ट्र आणि किनारपट्टीजवळील भागांमध्ये 14 जून रोजी मुसळधार पाऊस पडण्याची या वायू चक्रीवादळाचा मान्सूनवरही प्रभाव पडणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

Cyclone Vayu मुळे मुंबई शहराला धोका नाही; अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून आवाहन

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनीदेखील पूरग्रस्त ठिकाणांवर सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर मंगळवारी रूपाणी यांनी अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली. तसेच ज्या ठिकाणी चक्रीवादळाचा मोठा प्रभाव जाणवू शकतो अशा 10 जिल्ह्यांमध्ये 13 आणि 14 जून रोजी शाळा आणि महाविद्यालये बंद करण्याची घोषणा केलीय.