Cyclone Tauktae Update: तौक्ते चक्रीवादळामुळे 6 जणांचा बळी, 2 लाख नागरिकांचे स्थलांतर तर 410 जण अद्याप समुद्रात अडकले
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

Cyclone Tauktae Update:  कोरोना व्हायरसच्या परिस्थितीतच उद्भवलेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे भारतातील विविध ठिकाणी त्याचा जबरदस्त फटका बसल्याचे दिसून आले आहे. सर्वात प्रथम महाराष्ट्रात तौक्ते चक्रीवादळ धडकल्यानंतर आता गुजरातच्या दिशेने सरकल्यानंतर तेथे अॅक्टिव्ह झाले आहे. हवामान विभागाने आधीच सुचित केले होते की, चक्रीवादळामुळे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे राज्य सरकार आधीच अलर्ट झाले होते. संपूर्ण तयारी केल्यानंतर ही चक्रीवादळाच्या रौद्र रुपामुळे मोठे नुकसान झाले आहे. महाराष्ट्र, दमण आणि दीव, गुजरातच्या किनारपट्टी भागात त्याचा मोठा प्रभाव दिसून आला आहे.(Cyclone Tauktae: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तौक्ते चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा घेतला आढावा)

सोमवारी दुपारी तौक्ते चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात सोसाट्याच्या वाऱ्यासह तुफान पाऊस पडत होता. त्यानंतर गुजरातमध्ये आता हे चक्रीवादळ सरकले आहे. येथे जवळजवळ 185 प्रति तास वेगाने वारे वाहत होते. चक्रीवादळाच्या या कारणामुळे गुजरातच्या सरकारने जवळजवळ दीड लाख लोकांना हलवले आहे. जे किनारपट्टी भागात राहत होते.

चिंतेची बाब अशी आहे की, अरबी समुद्रात 410 लोकांसह दोन बोटी अद्याप बेपत्ता आहेत. नौसेनेकडून त्यांचा शोध घेतला जात आहे. परंतु चक्रीवादळ ऐवढे भयंकर आहे त्यामुळे ठोस माहिती समोर आलेली नाही.(Cyclone Tauktae Update: तौक्ते चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीवर पोहोचण्याची प्रक्रिया सुरू)

Tweet:

तर गुजरात मध्ये प्रवेश करण्यापूर्वी चक्रीवादळ महाराष्ट्रात धडकले होते. या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील कोकणात 6 जणांचा बळी गेला आहे. अद्याप 3 नाविक बेपत्ता आहेत. झाड पडून मृत्यू झालेल्यांचा सुद्धा मृतांमध्ये समावेश आहे. मुंबईतील बलार्ड इस्टेट येथे मोठ्या प्रमाणात झाडे पडली आहेत. त्याचसोबत शहरातील विविध ठिकाणी सुद्धा अशीच स्थिती निर्माण झाली आहे.

Tweet:

काल रात्रीच्या वेळेस एनडीआरएफच्या पथकाकडून दहीसर येथील परिसरात रस्त्यांवर पडलेली झाडे उचलण्याचे काम सुरु होते.

Tweet:

दरम्यान, तौक्ते चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्र, गुजरात आणि दमण-दीव येथे बसणार असल्याचा अंदाज  व्यक्त करण्यात आला आहे. तर केंद्राकडून राज्यांच्या मदतीसाठी हात पुढे करण्यात आला आहे. याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत तौक्ते चक्रीवादळासंदर्भात आढावा बैठक बोलावली होती.