Cyclone (Photo Credits: PTI)

Cyclone MAHA Impact Updates:  अरबी समुद्रामध्ये 'क्यार' चक्रीवादळानंतर आता 'महा' चक्रीवादळ (Cyclone MAHA) निर्माण झालं आहे. मात्र हवामान खात्याच्या अंदाजानुसार 'महा' चक्रीवादळाची तीव्रता आता कमी झाली आहे. मात्र या चक्रीवादळांमुळे ऐन नोव्हेंबर महिन्यातही महाराष्ट्रात वादळी पाऊस बसरत आहे. मात्र महाराष्ट्रासाठी दिलासादायक बाब म्हणजे अरबी समुद्रातील हे घोंघावणारे वादळ आता कमी झाले आहे. या वादळाची तीव्रता कमी झाल्याने ते वायव्येकडे सरकले आहे. गुरूवार (7 नोव्हेंबर) च्या सकाळपर्यंत हे चक्रीवादळ गुजरात किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे.

दरम्यान 6-8 नोव्हेंबर 'महा' चक्रीवादळ अरबी समुद्राजवळील पश्चिम किनारपट्टीला धडकेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. MAHA Cyclone: पालघर मध्ये 6-8 नोव्हेंबर दरम्यान शाळा, कॉलेज बंद; 'महा' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकार्‍यांचा निर्णय

 

ANI Tweet

‘महा’ चक्रीवादळ वेरावळपासून 720 किलोमीटर आणि पोरबंदरपासून 660 किलोमीटरवर आहे. गुरुवार सकाळपर्यंत पोरबंदर ते दीव दरम्यानच्या किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे हळूहळू या वादळाची तीव्रता देखील कमी होईल. हवामान खात्याच्या नव्या अंदाजानुसार, महा चक्रीवादळ कमाल 70-80 kmph च्या वेगाने गुरूवार पर्यंत पुढे सरकण्याची शक्यता आहे.