Petrol-Diesel | (Photo Credit: ANI)

आंतरराष्ट्रीय तेल बाजारात कच्चा (Crude Oil Prices) तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. आजवरचा इतिहास पाहता आंतरराष्ट्रीय तेल दरात वाढ झाली तर त्याचे थेट परिणाम देशांतर्गत तेल दरावर होत असतात. भारतात तर पाठिमागील तीन महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेल दर (Petrol-Diesel Price Today) स्थिर राहिले आहेत. केंद्र सरकारने आणि काही राज्य सरकारांनी इंधन दरावरील उत्पादन शुल्क कमी केल्यानेह इंधन दरात काहीशी कपात पाहायला मिळाली. सध्या हे दर स्थिर आहेत. 26 जानेवारी नंतरही या दरांमध्ये कोणताही बदल झाल्याचे पाहायला मिळत नाही. जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधन दर.

आंतरराष्ट्रीय तेल बाजारात कच्चा तेलाच्या किमती वाढल्या असूनही भारतातील तेल कंपन्यांनी इंधन दर वाढवले नाहीत. भारतातील इंधन कंपन्यांनी आजच पेट्रोल, डिझेलचे दर जाहीर केले. यात कोणत्याही प्रकारची वाढ पाहायला मिळत नाही. तेल दर स्थिर असल्यामुळे ग्राहकांना किंचीतसा दिलासा मिळत असला तरी आगामी काळात हे दर किती काळ स्थिर राहतात याबाबत उत्सुकता आहे. कारण ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय पातळीवर तेल दरांमध्ये वाढ होत आहे आणि उत्पादन शुल्क कमी केल्याने केंद्र सरकारच्या तिजोरीत घाटा होत आहे. या दोन्ही परस्परविरोधी गोष्टी पाहता तेलदरांची ही स्थिरता आणखी काही काळच कायम राहू शकते, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. (हेही वाचा, Electric Vehicle साठी REVOS चे BOLT चार्जिंग पॉईंट भारतात लॉन्च; ऑफर अंतर्गत 1 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध)

मुंबई शहरात आज पेट्रोल 109.98 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 94.14 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. राजधानी दिल्लीतही पेट्रोल 95.41 रुपये प्रति लिटर, तर डिझेलची किंमत 86.67 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

भारतीय पेट्रोलियम वितरण कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) या कंपन्या भारतातील पेट्रोल, डिझेल दर जाहीर करतात. हे दर या कंपन्या दररोज जाहीर करतात. या कंपन्यांनी जाहीर केलेल्या दरात पुढे केंद्र सरकारचा कर, राज्यांचा कर आणि इतर काही स्थानिक कर लागू होतात. त्यामुळे सहाजिकच वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळे दर पाहायला मिळतात.

पेट्रोल-डिझेल दर दररोज बदलत असतात. दररोज सकाळी 6 वाजता या दरांबाबत अद्ययावत माहिती दिली जाते. पेट्रोल-डिझेल दर आपण एसएमएस (SMS) करुनही पाहू शकता. इंडियन ऑयलच्या कस्टमर केअर RSP सोबत शहराचा कोड लिहून तो 9224992249 या क्रमांकावर आणि BPCL ग्राहक असाल तर RSP लिहून 9223112222 संदेश पाठवा. आपणास इंधनाचे दर समजू शकतील. HPCL ग्राहक HPPrice लिहून 9222201122 क्रमांकावर संदेश पाठवूनही माहिती मिळवू शकतात.