Close
Search

Electric Vehicle साठी REVOS चे BOLT चार्जिंग पॉईंट भारतात लॉन्च; ऑफर अंतर्गत 1 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध

इलेक्ट्रिक वाहन उत्पादक REVOS ने मंगळवारी बोल्ट पीअर-टू-पीअर चार्जिंग पॉइंट लाँच केले. हे चार्जिंग पॉइंट 29 ऑक्टोबर ते डिसेंबर अखेरपर्यंत प्रत्येकी 1 रुपयांच्या किमतीत उपलब्ध असतील.

ऑटो टीम लेटेस्टली|
Electric Vehicle साठी REVOS चे BOLT चार्जिंग पॉईंट भारतात लॉन्च; ऑफर अंतर्गत 1 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध
REVOS BOLT Charging Network (Photo Credits: REVOS)

इलेक्ट्रिक वाहन (Electric Vehicle) उत्पादक REVOS ने बोल्ट (BOLT) पीअर-टू-पीअर (Peer-to-Peer) चार्जिंग पॉईंट (Charging Points) लॉन्च  केले. हे चार्जिंग पॉईंट 29 ऑक्टोबर ते डिसेंबर अखेरपर्यंत प्रत्येकी 1 रुपयांच्या किमतीत उपलब्ध असतील. पुढील दोन वर्षांत REVOS चे 500 हुन अधिक शहरांमध्ये आणि इतर बाजारपेठांमध्ये 1 दशलक्ष बोल्ट चार्जिंग पॉईंट्स स्थापित करण्याचे उद्दिष्ट आहे. REVOS वेबसाइटवर बोल्ट 3,000 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

"BOLT कंपनी सर्वव्यापी होऊन EV उद्योगासाठी मोठे कार्य करण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे. पिवळ्या फोन बॉक्सप्रमाणेच आम्ही देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात हिरव्या BOLT चार्जिंग पॉइंट्सची कल्पना करत आहोत," असे REVOS चे सह-संस्थापक मोहित यादव म्हणाले.

BOLT स्थापित करण्यासाठी कोणत्याही अतिरिक्त पायाभूत सुविधांची आवश्यकता नाही आणि थोड्या देखभालीसह अगदी 30 मिनिटांच्या आत स्थापित केले जाऊ शकते. BOLT वर एक तास चार्ज केल्याने रायडर्सना त्यांच्या इलेक्ट्रिक वाहनासाठी एक दिवसाची रेंज मिळू शकते. उर्जेच्या वापरावर लक्ष ठेवण्यासाठी आणि खरेदीदाराला आयुष्यभर निष्क्रिय उत्पन्न मिळवण्यासाठी चार्जिंग युनिट्स ऊर्जा कॅल्क्युलेटरसह येतात, असे कंपनीने सांगितले. (हे ही वाचा: Revolt RV400 ई-बाईक ची बुकिंग सुरु; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स)

BOLT मालक 'सार्वजनिक' आणि 'खाजगी' ठिकाणी डिव्हाईस स्थापित करू शकतात. 'पब्लिक' चार्जिंग पॉइंट हे सर्व लोकांसाठी खुले असतील. या चार्जिंग पॉइंटसचे BOLT अॅप द्वारे बुकिंग करता येईल. 'खाजगी' म्हणून चिन्हांकित केलेले चार्जिंग पॉइंट केवळ डिव्हाईस मालकांच्या वापरासाठी असतील. प्री-लॉन्च टप्प्या, भारतातील 60 वेगout this link https%3A%2F%2Fmarathi.latestly.com%2Fauto%2Frevos-bolt-peer-to-peer-charging-point-for-electric-vehicles-launch-available-at-1-rupees-under-offer-299454.html" title="Share by Email">

ऑटो टीम लेटेस्टली|
Electric Vehicle साठी REVOS चे BOLT चार्जिंग पॉईंट भारतात लॉन्च; ऑफर अंतर्गत 1 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध
REVOS BOLT Charging Network (Photo Credits: REVOS)

इलेक्ट्रिक वाहन (Electric Vehicle) उत्पादक REVOS ने बोल्ट (BOLT) पीअर-टू-पीअर (Peer-to-Peer) चार्जिंग पॉईंट (Charging Points) लॉन्च  केले. हे चार्जिंग पॉईंट 29 ऑक्टोबर ते डिसेंबर अखेरपर्यंत प्रत्येकी 1 रुपयांच्या किमतीत उपलब्ध असतील. पुढील दोन वर्षांत REVOS चे 500 हुन अधिक शहरांमध्ये आणि इतर बाजारपेठांमध्ये 1 दशलक्ष बोल्ट चार्जिंग पॉईंट्स स्थापित करण्याचे उद्दिष्ट आहे. REVOS वेबसाइटवर बोल्ट 3,000 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

"BOLT कंपनी सर्वव्यापी होऊन EV उद्योगासाठी मोठे कार्य करण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे. पिवळ्या फोन बॉक्सप्रमाणेच आम्ही देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात हिरव्या BOLT चार्जिंग पॉइंट्सची कल्पना करत आहोत," असे REVOS चे सह-संस्थापक मोहित यादव म्हणाले.

BOLT स्थापित करण्यासाठी कोणत्याही अतिरिक्त पायाभूत सुविधांची आवश्यकता नाही आणि थोड्या देखभालीसह अगदी 30 मिनिटांच्या आत स्थापित केले जाऊ शकते. BOLT वर एक तास चार्ज केल्याने रायडर्सना त्यांच्या इलेक्ट्रिक वाहनासाठी एक दिवसाची रेंज मिळू शकते. उर्जेच्या वापरावर लक्ष ठेवण्यासाठी आणि खरेदीदाराला आयुष्यभर निष्क्रिय उत्पन्न मिळवण्यासाठी चार्जिंग युनिट्स ऊर्जा कॅल्क्युलेटरसह येतात, असे कंपनीने सांगितले. (हे ही वाचा: Revolt RV400 ई-बाईक ची बुकिंग सुरु; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स)

BOLT मालक 'सार्वजनिक' आणि 'खाजगी' ठिकाणी डिव्हाईस स्थापित करू शकतात. 'पब्लिक' चार्जिंग पॉइंट हे सर्व लोकांसाठी खुले असतील. या चार्जिंग पॉइंटसचे BOLT अॅप द्वारे बुकिंग करता येईल. 'खाजगी' म्हणून चिन्हांकित केलेले चार्जिंग पॉइंट केवळ डिव्हाईस मालकांच्या वापरासाठी असतील. प्री-लॉन्च टप्प्या, भारतातील 60 वेगवेगळ्या शहरांमध्ये 3,600KW पेक्षा जास्त क्षमतेसह हजारो BOLT चार्जिंग पॉईंट स्थापित केले गेले आहेत, असे कंपनीने सांगितले.

रायडर्स REVOS BOLT मोबाईल अॅपवर सर्वात जवळचा चार्जिंग पॉईंट देखील शोधू शकतात. त्यानंतर QR कोड स्कॅन करून गरजेनुसार चार्जर वापरू शकतात आणि वापरलेल्या चार्जिंगसाठी पैसे देऊ शकतात. REVOS ची स्थापना यादव आणि ज्योतिरंजन यांनी 2017 मध्ये केली होती. युनियन स्क्वेअर व्हेंचर्स आणि प्राईम व्हेंचर पार्टनर्सकडून त्याने 4.5 दशलक्ष डॉलर्स इतका निधी उभारला असून बंगळुरू आणि सिंगापूर मध्ये त्यांची कार्यालये आहेत.

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change
शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change