सामान्य व्यक्तींना आणखी एक झटका, महागाईने रेकॉर्ड मोडत मे महिन्यात CPI 6.30 टक्क्यांवर पोहचला
Market (Photo Credits-Twitter)

महागाईमुळे करण्यात येणाऱ्या आंदोलनानंतर आणखी एक झटका नागरिकांना बसला आहे. सोमवारी सकाळी थोक महागाई दर 12,.9 टक्क्यांचा रेकॉर्ड उच्च स्तरावर पोहचला होता. अशातच आता समोर आले की, मे महिन्यात किरकोळ महागाई वाढून 6.3 टक्क्यांवर पोहचली आहे. ही महागाई गेल्या 6 महिन्यांमधील किरकोळ महागाईच्या सर्वाधिक आहे. सरकारकडून सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या किरकोळ महागाईच्या आकडेवारीनंतर ही बाब समोर आली आहे.(Rahul Gandhi on Modi Government: मोदी सरकारने काय वाढवलं? बेरोजगारी, महागाई आणि मित्रांची कमाई; राहुल गांधी यांचा केंद्र सरकारवर निशाणा)

मे महिन्यात CPI हा 4.23 टक्क्यांनी वाढून 6.30 टक्क्यांवर पोहचला आहे. तर तो 5.39 टक्क्यांवर राहिल असा अनुमान लावण्यात आला होता. मे महिन्यात खाण्यापिण्याच्या गोष्टींची किरोकोळ महागाई एप्रिल मध्ये 1.96 टक्क्यांवरुन 5.01 टक्क्यांवर आली आहे. तर प्रत्येक महिन्याच्या आधारावर मे महिन्यात भाज्यांची महागाई -14.18 टक्क्यांनी वाढून -1.92 टक्क्यांवर आली आहे.(Wholesale Fuel Prices & Inflation: पेट्रोल-डिझेल घाऊक महागाई दरात मे महिन्यात 12.94% वाढ)

Tweet:

मे महिन्यात इंधन आणि विजेची महागाई एप्रिलमध्ये 7.91 टक्क्यांवरुन 11.58 टक्क्यांवर आली आहे. तर हाउसिंग महागाई 3.3 टक्क्यांऐवजी 3.86 टक्के झाली आहे. तसेच कपडे, चप्पल यांच्या किंमतीत सुद्धा वाढ झाली असून महागाई 5.32 टक्क्यांवर आली आहे. मे महिन्यात एकूण महागाई दर एप्रिल 5.40 टक्क्यांवरुन 6.6 टक्के झाली आहे.