Coronavirus (Photo Credits: Pixabay)

भारतामध्ये (India) आज (22 एप्रिल) मागील 24 तासांत कोरोनाबाधित झालेल्यांची आकडेवारी चिंताजनक आहे. Ministry of Health and Family Welfare कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार भारतात मागील 24 तासांमध्ये 3 लाख 14 हजार 835 कोरोनाबाधित रूग्ण (COVID Positive) समोर आले आहेत. त्यामुळे सध्या देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1,59,24,989 वर पोहचली आहे. ही कोरोनाबाधितांची आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. मागील 2020 च्या मार्च महिन्यापासून देशात कोरोना धुमाकूळ घालत आहे. दरम्यान कोरोनाबाधितांसोबतच कोरोना मृत्यू संख्येमध्येही वाढ होत आहे. काल 24 तासांत 2104 मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. यामध्ये सर्वाधिक मृत्यू हे महाराष्ट्रात (Maharashtra)  568 आहेत तर त्याखालोखाल दिल्लीत (Delhi) 249 मृत्यू झाले आहेत. आतापर्यंत भारतामध्ये 1,84,672 जणांचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे. Triple Mutation in India: चिंता वाढली! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये समोर आले विषाणूचे 'ट्रिपल म्टेयूशन'; महाराष्ट्र, दिल्ली, पश्चिम बंगाल याठिकाणी नव्या व्हेरिएंटची शक्यता.

भारतामध्ये फेब्रुवारी 2021 च्या मध्यापासून झपाट्याने कोरोनारूग्णांमध्ये वाढ होत असल्याचं पहायला मिळालं आहे. मागील 17 दिवसांतच ही वाढ तिप्प्ट आहे. 15 एप्रिलला भारतात पहिल्या6डा 24 तासांमधील कोरोना रूग्णांमधील वाढ ही 2 लाखांचा टप्पा पार करून पुढे गेली होती आणि आता 22 एप्रिलला हा टप्पा 3 लाखांच्याही पार गेला आहे. worldometers.info च्या माहितीनुसार 2021 मध्ये जानेवारी 8 ला अमेरिकेत अशाप्रकारे 3 लाखांच्या पार कोरोनाबाधितांची संख्या गेली होती. पण तो आकडा 3,07,581 होता. भारतामध्ये आज त्याही पेक्षा अधिक कोरोनाबाधित नोंदवण्यात आले आहेत.

भारतामध्ये दिल्ली, महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये झपाट्याने कोरोना रूग्णांमध्ये वाढ होत आहे. काल (21 एप्रिल) भारतातील 17 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये आतापर्यंतची सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्णसंख्या पहायला मिळाली आहे.

आजच्या आकडेवारीनुसार, भारतामध्ये एकूण अ‍ॅक्टिव्ह रूग्नांचा आकडा 22,84,411 इतका आहे. तर आतापर्यंत 1,34,49,426लोकांनी कोरोनावर मात केली आहे.