Coronavirus | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

कोरोना व्हायरसने (Coronavirus) भारतात हाहाकार माजवला आहे. अनेक प्रयत्न करूनही या संक्रमणावर पूर्णतः विजय मिळवणे शक्य झाले नाही. गेल्या 24 तासात कोरोनाचे जवळपास तीन लाख नवीन रुग्ण आढळले आहेत आणि 2000 पेक्षा जास्त संक्रमित लोकांचा मृत्यू झाला आहे. अचानक समोर आलेले दुहेरी उत्परिवर्तन म्हणजेच कोरोनाचा डबल म्यूटेंट (Double Mutation) हे संसर्गाचे वाढते कारण असल्याचे म्हटले जात आहे. त्याच्याही पुढे जाऊन आता, विषाणूच्या नव्या तिसर्‍या व्हेरिएंटची म्हणजे ट्रिपल म्युटेशनची (Triple Mutation) चर्चा आहे, जे देशासाठी एक नवीन आव्हान व चिंता ठरू शकते.

एक नवीन व्हेरिएंट बनण्यासाठी तीन वेगवेगळे कोव्हिड स्ट्रेस मिळाले आहेत, ज्यांना ट्रिपल उत्परिवर्तन म्हणजेच ट्रिपल म्यूटेशन म्हणतात. हा नवीन प्रकार देशाच्या काही भागात सापडला आहे. असे मानले जात आहे की, महाराष्ट्र, दिल्ली आणि पश्चिम बंगाल यांसारख्या राज्यात तिहेरी उत्परिवर्तन होण्याची प्रकरणे आहेत. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, जागतिक स्तरावर या नवीन कोरोना व्हेरिएंटमुळे संसर्ग अजून वाढू शकतो. 'हिंदुस्तान टाईम्स'च्या वृत्तानुसार, महाराष्ट्रात कोरोनाच्या 60 टक्के नमुन्यात डबल म्यूटेशन आढळले होते.

डबल म्यूटेशन प्रकाराला वैज्ञानिकदृष्ट्या B.1.617 असे नाव देण्यात आले आहे, ज्यामध्ये दोन प्रकारचे म्यूटेशन आहेत- E484Q आणि L452R म्यूटेशन. आता विषाणूमध्ये तिसरे म्यूटेशन आढळून आले आहे. मॅकगिल युनिव्हर्सिटीचे (McGill University) एपिडेमिओलॉजीचे (Epidemiology) प्रोफेसर मधुकर पै म्हणाले, 'ट्रिपल म्यूटेशन हा एक संसर्गजन्य प्रकार आहे. यामुळे बरेच लोक फार लवकर आजारी पडतात. यासाठी आम्हाला लसीमध्ये सतत सुधारणा करणे गरजेचे आहे. त्यासाठी, आम्हाला हा रोग समजून घ्यावा लागेल.' पै यांच्यामते डबल म्युटेशन शोधण्यात होणाऱ्या दिरंगाईमुळे आता हा ट्रिपल म्युटेशन वेगाने पसरत आहे. (हेही वाचा: COVAXIN बाबत मोठी दिलासादायक बातमी; SARS-CoV-2 सोबतच Double Mutant Strain वरही प्रभावी असल्याचा निष्कर्ष ICMR कडून जारी)

काही काळापूर्वी, भारतात डबल म्युटेशन आले, जे दोन स्ट्रेननी तयार झाले होते. यानंतर, आता तीन कोविड व्हेरिएंटने बनून ट्रिपल म्युटेशन समोर आले आहे. हे म्युटेशन केवळ भारतातच नव्हे तर जगभरात नवीन संक्रमण पसरवत असल्याचे तज्ञांचे मत आहे. अधिक अभ्यासांद्वारे समजले जाईल की ट्रिपल म्युटेशन किती संक्रामक आहे किंवा किती प्राणघातक आहे. सध्या भारतामध्ये केवळ 10 लॅब व्हायरस जीनोम अभ्यासात सामील आहेत.