COVID-19 In India: भारतात नव्या कोरोना रूग्णवाढीत, सक्रिय रूग्णांमध्ये घट कायम; मागील 24 तासांत  1,27,510 जणांना कोरोनाचे निदान
COVID 19 | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

भारतामध्ये कोरोना नव्या कोरोना रूग्णाच्या वाढीचा दर आजही उतरता आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आजच्या आकडेवारीनुसार, देशात मागील 24 तासांत 1,27,510 जणांना कोरोनाचे निदान झाले आहे. ही मागील 54 दिवसांमधील निच्चांकी कोरोना रूग्ण वाढ आहे. त्यामुळे सरकार आणि आरोग्य यंत्रणेसाठी ही मोठी दिलासादायक बाब आहे. दरम्यान देशातील अ‍ॅक्टिव्ह रूग्णांची संख्या देखील कमी होत आहे. भारतात सध्या 18,95,520 सक्रीय रूग्ण आहेत. ही देखील 20 लाखाखाली तब्बल 43 दिवसांनंतर नोंदवण्यात आली आहे. मागील 24 तासांत अ‍ॅक्टिव्ह रूग्ण हे 1,30,572 ने कमी झाले आहेत.

भारतामध्ये एकूण 2,59,47,629 जणांनी आतापर्यंत कोविड 19 वर मात केली आहे. त्यापैकी काल 2,55,287 जण डिस्चार्ज झाले आहेत. तर मृत्यूमुखी पडलेल्यांचा एकूण आकडा 3,31,895 आहे. काल यामध्ये 2,795 जणांची भर पडली आहे. भारतात मागील 2 महिन्यांपासून कोरोनाची दुसरी लाट धुमाकूळ घालत आहेत देशाला विविध स्तरांवर याचा फाटका बसला आहे. Delta Variant in India: भारतात पहिल्यांदाच आढळला कोरोना स्ट्रेन, WHO कडून ‘डेल्टा’ आणि ‘कप्पा’ असे नामकरण.

ANI Tweet

दरम्यान कोविडच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांनी कडक लॉकडाऊन जाहीर केले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्राचादेखील समावेश आहे. महाराष्ट्रात शहरी भागात कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात असली तरीही ग्रामीण भागात रूग्ण वाढत असल्याने अद्यापही ब्रेक द चेन अंतर्गत नियम कडक आहे. राज्यात 20% पेक्षा कमी पॉझिटीव्हिटी रेट असलेल्या भागात आजपासून थोडी शिथिलता देण्यात आली आहे.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेशी मुकाबला करताना आणि तिसर्‍या लाटेला रोखण्यासाठी आता लसीकरण देखील वेगवान करण्यात आलं आहे. सध्या भारतामध्ये 21,60,46,638लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे.