COVID 19 | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

आज केंद्रीय आरोग्य मंत्रलायाने दिलेल्या माहितीनुसार, देशात मागील 24 तासांमध्ये 1,96,427 नवे कोरोनाबाधित रूग्ण (COVID 19)  समोर आले आहेत. मागील वर्ष -दीड वर्ष सुरू असलेल्या जागतिक महामारीचे (Coronavirus Pandemic) आता भारतातील एकूण कोरोनाबाधित रूग्ण 2,69,48,874 वर पोहचले आहेत. डिसेंबर 2019 पासून या जागतिक संकटाने सर्वत्र थैमान घातले आहे. पण भारतासाठी आजचा दिवस दिलासादायक आहे. आजची कोरोनाबाधितांची आकडेवारी ही या महिन्यातील निच्चांकी आहेच पण साधारण 15 एप्रिल नंतर पहिल्यांदाच देशात 2 लाखांपेक्षा कमी कोविड 19 रूग्ण समोर आले आहेत. काल दिवसभरात 3511 जणांची कोविड 19 विरूद्धची लढाई अयशस्वी ठरल्याने त्यांचे निधन झाले आहे. तर देशात सध्या 25,86,782 अ‍ॅक्टिव्ह रूग्ण आहेत.

Johns Hopkins University च्या माहितीनुसार, जगात कोरोनाबाधितांची आकडेवारी 16.71 कोटी झाली आहे तर 34.69 लाख मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. जगात अमेरिका पाठोपाठ भारतात सर्वाधिक कोरोनारूग्ण आहेत. तर ब्राझील तिसर्‍या स्थानी आहे.  (नक्की वाचा: COVID 19 Vaccination Fresh Guidelines: कोविड वर मात केल्यानंतर 3 महिन्यांनी मिळणार लस, आता स्तनदा माता देखील घेऊ शकतात लस; केंद्रीय आरोग्य मंंत्रालयाची नवी नियमावली).

ANI Tweet

भारतामध्ये महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा अधिक आहे. पण मागील काही दिवसांत महाराष्ट्रातील शहरी भागात कोरोना वर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. महाराष्ट्रात लसीकरण देखील 2 कोटीच्या पार गेले आहे त्यामुळे कोविड 19 विरूद्धचा लढा अधिक निकरीने लढला जात आहे. दरम्यान सध्या भारतात 18 वर्षांवरील सार्‍यांना कोविड 19 ची लस दिली जात आहे. देशात एकूण 19,85,38,999 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत तिसर्‍या ला तिसर्‍या लाटेचा धोका पाहता लसीकरणाचा वेग वाढवण्याचा सरकारचा मानस आहे.