Vaccine | Image used for representational purpose (Photo Credits: Oxford Twitter)

भारतामध्ये जानेवारी 2021 ला कोणत्याही आठवड्यात कोविड 19 च्या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळू शकते असे सांगण्यात आल्यानंतर आता प्रशासन कामाला लागले आहे. ब्रिटनमध्ये कालच ऑक्सफर्ड- अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या लसीला मान्यता मिळाल्यानंतर भारतातही DGCI च्या बैठका सुरू झाल्या आहेत. यामध्ये आज केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने 2 जानेवारी 2021 पासून देशात सार्‍या राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत कोविड 19 लसीच्या ड्राया रनला सुरूवात करण्याचे निर्देश दिले आहेत. काही दिवसांपूर्वी या ड्राय रन्स गुजरात, पंजाब, आंध्र प्रदेशात पार पडल्या आहेत. Covid-19 Vaccine Dry Run: पंजाब, आसाम, आंध्र प्रदेश, गुजरात मध्ये 28, 29 डिसेंबरला कोविड 10 लसीची ड्राय रन; अशी असेल प्रक्रिया.

केंद्रीय हेल्थ सेक्रेटरी राजेश भूषण यांनी आज व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारा तातडीची बैठक घेत कोविड 19 लसीकरणाच्या तयारीचा आढावा घेतला आहे. भारतात येत्या काही दिवसांत लसीकरणाला सुरूवात होण्यापूर्वी प्रत्येक सरकारला त्याबाबतीचे टास्क फॉर्स तयार करण्याचे, आरोग्य कर्मचार्‍यांना लसीकरणासाठी आवश्यक प्रशिक्षण देण्याच्या सूचना आहेत. दरम्यान प्रत्येक राज्याच्या राजधानीमध्ये 3 सेशन साईट्सवर त्या घेतल्या जाव्यात अशा सूचना आहेत. काही ठिकाणी दुर्गम भागातील सेंटर्सचा देखील या ड्राया रनमध्ये समावेश करण्याचा सूचना आहेत.

ANI Tweet

आज नरेंद्र मोदी यांनी राजकोटमध्ये एम्स रूग्नालयाचं उद्घाटन करताना नागरिकांना लसीकरणाबाबत खोट्या वृत्तापासून दूर राहण्याचं आवाहन केले आहे. भारतामध्ये सध्या 3 लसींनी DGCI कडे आपत्कालीन वापरासाठी लसींच्या मंजुरीला अर्ज केला आहे. त्यापैकी भारतामध्ये सीरमच्या कोविशिल्डला प्रथम मंजुरी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.