प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्यः फेसबुक)

देशभरात कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक अधिक भर पडत चालली आहे. त्यामुळे नागरिकांना घरीच थांबण्याचे आवाहन केले जात आहे. सरकारकडून ही लॉकडाउनचे (Lockdown) आदेश दिले असून या काळात अत्यावश्यक सेवासुविधा नागरिकांसाठी सुरु राहणार आहेत. परंतु अत्यावश्यक सेवासुविधा खरेदी करताना गर्दी करण्यास मनाई आहे. त्याचसोबत नागरिकांनी सोशल डिस्टंन्सिंगचा (Social Distancing) नियम अंमलात आणावा अशी सुद्धा सुचना दिली आहे. याच पार्श्वभुमीवर गोवा मत्स्य संचलनाकडून मच्छीमारांना मासे विक्री करण्यास परवागनी देण्यासंबंधित अ‍ॅडव्हायजरी जारी केली आहे.

मासे विक्रेतांसाठी जाहीर करण्यात आलेल्या अ‍ॅडव्हायजरी नुसार असे सांगण्यात आले आहे की, किरकोळ दराने माशांची विक्री करताना सोशल डिस्टंन्सिंग पाळावे. तसेच ज्या ठिकाणी मत्स्य विक्री केली जाणार आहे तेथील नागरिकांनी स्वच्छेतेबाबत अधिक काळजी घ्यावी. मासे विक्री करण्यासाठी खुल्या पद्धतीने किंवा गर्दी करुन विकण्यास मच्छीमारांना परवानगी नाही. पण मच्छीमारांना माशांची घरपोच विक्री करण्याचा पर्याय सुचवण्यात आला आहे. तसेच माशांची वाहतूक करणारे वाहन सुद्धा स्वच्छ असावे असे ही सांगण्यात आले आहे.(कोरोना व्हायरस विरोधातील लढ्यासाठी भारतीय रेल्वेने तयार केलं स्वस्त व्हेंटिलेटर ‘जीवन’; जाणून घ्या किंमत)

दरम्यान, लॉकडाउनच्या काळात राज्यभरात परदेशी नागरिकांना भारतात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. गोव्यात यापूर्वी आलेल्या परदेशी नागरिकांची कोरोना व्हायरसची चाचणी करण्यात आली होती. तर शुक्रवारी गोव्यात आणखी एका व्यक्तीला कोरोनाची लागण  झाल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे गोव्यात सध्या 6 कोरोनाबाधित रुग्ण असल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली होती.