कोरोना व्हायरस (Coronavirus) विरोधातील लढ्यासाठी भारतीय रेल्वेने (Indian Railways) स्वस्त व्हेंटिलेटर (Ventilator) तयार केलं आहे. ‘जीवन' (Jeevan) असं या व्हेंटिलेटरचं नाव आहे. पंजाबमधील कपुरथला येथील ‘रेल्वे कोच फॅक्टरी’मध्ये हे हेंटिलेटर बनवण्यात आले आहेत. या व्हेंटिलेटरी किंमत कंप्रेसरशिवाय केवळ 10 हजार रुपये आहे. मात्र, या व्हेंटिलेटरला अद्याप आयसीएमआरने मंजुरी दिलेली नाही.
कोरोना विरोधातील लढाईत भारतीय रेल्वेचा मोठा वाटा आहे. यापूर्वीही रेल्वेने मास्क तसेच सॅनिटाझरची निर्मिती केली आहे. आयसीएमआरची मंजुरी मिळाल्यानंतर, दररोज 100 व्हेंटिलेटर बनवण्याची तयारी असल्याचं रेल्वे कोच फॅक्टरीचे महाव्यवस्थापक रविंद्र गुप्ता यांनी म्हटलं आहे. (हेही वाचा - Coronavirus: कोरोना व्हायरस संकटाच्या उपाययोजनांबद्दल WHO कडून भारताचे कौतुक - पंतप्रधान नरेंद्र मोदी)
विशेष म्हणजे या व्हेंटिलेटरचा आकार आवश्यकतेनुसार बदलता येतो. तसेच त्याचा कोणत्याही प्रकारचा आवाज येत नाही. रविंद्र गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या व्हेंटिलेटरची किंमत 15 ते 20 लाख रुपये आहे. मात्र, आम्ही बनवलेले व्हेंटिलेटर हे कंप्रेसरशिवाय जवळपास दहा हजार रुपयांत खरेदी करता येऊ शकते. तसेच यात काही इंडिकेटर लावले तरी त्याची किंमत 30 हजारांपेक्षा जास्त असणार नाही.
कोरोना 🦠 के विरुद्ध लड़ाई में कपूरथला रेल कोच फैक्ट्री के इंजीनियर्स ने 'जीवन' नाम के वेंटिलेटर के प्रोटोटाइप का निर्माण किया है, जो बेहद सस्ता है।
स्वदेशी तकनीक से बना यह वेंटिलेटर कोरोना महामारी से लड़ रहे हमारे साथियों केे लिये बड़ी राहत का काम करेगा। pic.twitter.com/HS2ls1XZx1
— Piyush Goyal (@PiyushGoyal) April 6, 2020
सध्या देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे या रुग्णांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय उपकरणांची आवश्यता आहे. मात्र, देशात व्हेंटिलेटर्सची कमतरता आहे. सध्या भारतात केवळ 57 हजार व्हेंटिलेटर्स आहेत. त्यामुळे कोरोना बाधितांची संख्या आणखी वाढली तर व्हेंटिलेटर्स अभावी अनेकांना जीव गमवावा लागू शकतो. परंतु, केंद्र सरकारने देशातील अनेक उत्पादकांना व्हेंटिलेटर्स बनवण्याची ऑर्डर दिली आहे.