कोरोना व्हायरस लॉकडाउन 3 (Coronavirus Lockdown 3) सोमवारपासून म्हणजेच उद्यापासून सुरू होईल. एकूण 40 दिवसांच्या दोन लॉकडाऊननंतर केंद्र सरकारने तिसर्या लॉकडाऊनमध्ये थोडी सवलत दिली आहे. या सूटमध्ये ग्रीन आणि ऑरेंज झोन व्यतिरिक्त रेड झोनमध्ये दारूची दुकाने उघडण्यास सरकारने मान्यता दिली आहे. सरकारच्या या निर्णयानंतर सोमवारपासून राजधानी दिल्लीत (Delhi) 450 दारूची दुकाने उघडली जातील. ही दुकाने अशी आहेत जी कंटेन्मेंट झोन (Containment Zones) मध्ये येत नाहीत व ही स्वतंत्र दारूची दुकाने मॉलमध्येही नाहीत. वृत्तसंस्था पीटीआयच्या म्हणण्यानुसार, राष्ट्रीय राजधानीमधील ही दुकाने 22 मार्चपासून बंद होती.
दिल्ली उत्पादन शुल्क विभागाच्या माहितीनुसार, राष्ट्रीय राजधानीत मॉल आणि कंटेन्मेंट झोनमधील दुकानांसह 545 दारूची दुकाने आहेत. दिल्ली सरकारने शनिवारी राष्ट्रीय राजधानीतील दारूच्या दुकानांची यादी मागितली होती, आता त्यांना काही अटीसह ती उघडण्यास परवानगी देण्यात आली. 4 मेपासून देशभरात लॉक डाऊन वाढविताना, गृह मंत्रालयाने ग्रीन आणि ऑरेंज झोनसोबत रेड झोनमधील हॉटस्पॉटवगळता दारू आणि तंबाखूची दुकाने उघडण्यास परवानगी दिली. सध्या दिल्लीतील सर्व 11 जिल्हे रेड झोनमध्ये असून तेथे एकूण 96 कंटेन्मेंट झोन आहेत. (हेही वाचा: रेड झोनमध्ये काही अटींच्या आधारावर दारुच्या दुकानांसह Standalone Shops सुरु करण्यास महाराष्ट्र शासनाची परवानगी; कन्टेंमेंट झोनमध्ये मात्र नियम कडक)
यासह दुकानांमध्ये सामाजिक अंतराचे पालन व्हावे आणि स्वच्छतेचे नियम काटेकोरपणे पाळले जावेल, असे सांगण्यात आले आहे. सध्या सरकारने कंटेन्मेंट झोन वगळता इतर ठिकाणी दुकाने व 33 टक्क्के कर्मचाऱ्यांसह ऑफिसेस उघडण्यास परवानगी दिली आहे. दुसरीकडे महाराष्ट्र सरकारनेही कंटेन्मेंट झोन वगळता इतर ठिकाणी दारूची दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. दरम्यान, राष्ट्रीय राजधानीत कोरोना व्हायरस आजाराचे 384 नवीन प्रकरणे समोर आले आहेत. यासह शनिवारी एकूण रुग्णांची संख्या 4,122 वर पोहोचली. दिल्ली सरकारच्या म्हणण्यानुसार मृतांचा आकडा 64 वर गेला आहे.