Coronavirus | Representational Image (Photo Credits: Pixabay)

भारतातील कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमितांची संख्या दिवसेंदविस वाढतच आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार पाठिमागील 24 तासात देशभरात तब्बल 2,71,202 जणांना कोरोना व्हायरस (COVID-19) संसर्ग झाला आहे. शनिवारी हाच आकडा 2,68, 833 इतका होता. म्हणजेच त्या तुलनेत ही संख्या तब्बल 15 लाखांनी वाढली आहे. देशात उपचार घेत असलेल्या सक्रीय रुग्णांची संख्या 15,50,377 इतकी झाली आहे. शनिवारच्या तुलनेत एकूण पॉझिटीव्हीटी दर काहीसा मंदावला आहे. शनिवारी जो पॉझिटीव्हीटी दर 16.66% होता तो किंचित कमी होऊन रविवारी 16.28% इतका झाला आहे. साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दर 13.69% इतका जाला आहे. आतापर्यंत 70.24 कोटी नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. पाठिमागील 24 तासात 16,65,404 चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशातील कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण (रिकवरी रेट) विचारात घ्यायचा तर त्यात काहीशी घट झाली आहे. हा दर सध्या 94.51% वर आहे. पाठिमागील 24 तासात 1,38,331 लोक उपचार घेऊन बरे झाले आहेत. त्यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत 3,50,85,721 लोक कोरोना संक्रमनातून मुक्त झाले आहेत. दरम्यान, पाठिमागील 24 तासात 314 जणांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. (हेही वाचा, Aurangabad: औरंगाबाद शहरात लहान 65 मुलांना कोरोना संसर्ग)

ट्विट

दरम्यान, अवघ्या देशाचे आणि जगाचे लक्ष लागून राहिलेला कोरोनाचा नवा व्हेरीएंट ओमायक्रोन संक्रमितांमध्ये 28.17% वाढ झाल्याचे पाहायला मिळते आहे. आतापर्यंत देशात ओमायक्रोन संक्रमितांची संख्या 7,743 इतकी झाली आहे.