महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे चित्र आहे. आतापर्यंत कोरोना व्हायरस (COVID-19) संसर्ग फक्त मोठ्या माणसांना झाल्याचे पाहायला मिळत होते. लहान मुलांमध्ये त्याचे प्रमाण तितके नव्हते. मात्र, औरंगाबद शहरातून आलेल्या वृत्तामुळे अनेकांना धक्का बसला आहे. एटक्या औरंगाबद शहरातील तब्बल 65 मुलांना कोरोना व्हायरस संसर्ग (Aurangabad Coronavirus) झाला आहे. त्यामुळे महापालिकेकडून जोरदार हालचाली सुरु झाल्या असून लहान मुलांचेही एक स्वतंत्र कोविड सेंटर सुरु करण्याबाबत विचार केला जातो आहे.
औरंगाबाद शहरात लहान मुलांमध्ये कोरोनाचे संक्रमण अचानक वाढल्यामुळे पालकांमध्ये चिंता वाढली आहे. एकट्या शुक्रवारी (14 जानेवारी) औरंगाबादमध्ये 401 जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे पुढे आले. यात 0 ते 18 वयोगटातील 34 मुलांचा समावेश होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी शनिवारी (15 जानेवारी) शहरात 423 कोरोना रुग्ण सापडले. त्यातही 0 ते 18 वर्षे वयोगटातील 31 मुलांचा समावेश होता. तर 0 ते 14 या वयोगटातील 16 जणांचा समावेश होता. (हेही वाचा, BMC Guidelines For Self-Test Kits: सेल्फ-टेस्ट किट खरेदी आणि तपासणीबाबत मुंबई महापालिकेची नवी नियमावली, महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली माहिती)
माहिती कार्यालयाने याबाबत माहिती देताना म्हटले आहे की, औरंगाबाद जिल्ह्यात शनिवारी आढळून आलेली रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे, संपूर्ण जिल्ह्यात 540 रुग्ण. त्यापैकी महापालिका हद्द्दीत 423 रुग्ण आणि ग्रामिण औरंगाबाद मध्ये 117 रुग्ण. कोरोना व्हायरस संसर्गामुळे रुग्णालयात दाखल झालेल्यांपैकी 147 जण वैद्यकीय उपचारामुळे बरे झाले. त्यांना डिस्चार्ज (सुट्टी) देण्यात आली. तर 106 जणांवर अद्यापही उपचार सुरु आहेत.