Coronavirus In India | Photo Credits: Pixabay.com

भारतामध्ये दिवसागणिक कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये वाढ होताना पहायला मिळत आहे. दरम्यान आज (15 मे) भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 81970 पर्यंत पोहचला आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने आज दिलेल्या माहितीनुसार देशामध्ये मागील 24 तासामध्ये 3967 नव्या रूग्णांची भर पडली आहे. तर 100 नव्या रूग्णांचा मृत्यू झाला आहे. भारतामध्ये सध्या 51,401 रूग्णांवर उपचार सुरु असून सुमारे 27 हजार 920 रूग्णांना रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर आतापर्यंत भारतार कोरोनाग्रस्तांच्या मृतांचा आकडा 2649 इतका आहे. भारतात सर्वाधिक रूग्णसंख्या महाराष्ट्र राज्यात आहे. काल रात्री राज्य आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात आत्तापर्यंतचे सर्वाधिक म्हणजेच 1600 पेक्षा अधिक रूग्ण आढळल्याने चिंतेमध्ये वाढ झाली आहे. Coronavirus केवळ फुफ्फुसांवर नव्हे तर मेंदू, हृद्य, किडनी सह शरीराच्या अन्य अवयवांवरही करतो घातक परिणाम; पहा COVID-19 चा रूग्णांच्या शरीरावर होणार्‍या गंभीर परिणामांबद्दल संशोधकांचा अभ्यास काय सांगतो.

भारतामध्ये काही अंशी प्रवासाला मंजुरी देण्यात आली आहे. विशेष ट्रेन आणि बस सेवेच्या माध्यमातून प्रवास केला जात आहे. त्यामुळे काही कोरोनाबाधित क्षेत्रातून बाहेर पडणार्‍यांच्या माध्यमातून कोरोना व्हायरस पसरत आहे. दरम्यान मागील दीड महिन्यापासून गोवा राज्यात कोरोनाचा एकही रूग्ण नव्हता. मात्र काही दिवसांपूर्वी मुंबईमधून गोव्यात दाखल झालेल्या असिम्प्टेमॅटिक रूग्णांच्या माध्यमातून 8 जण कोरोनाबाधित असल्याचं गोव्यामध्ये समोर आलं आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड मध्येही येणारे चाकरमणी कोरोनाबाधित असल्याने कोरोनाचा धोका वाढत आहे.

ANI Tweet

भारतामध्ये कोरोना व्हायरसचा वाढता विळखा पाहता आता देशात लॉकडाऊन 4 ची घोषणा करण्यात आली आहे. 18 मे पूर्वी हा चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन कसा असेल याची माहिती नागरिकांना दिली जाईल असे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी भारतीयांना संबोधित केलेल्या भाषणामध्ये स्पष्ट केले आहे.