Coronavirus In India: भारतात कोरोना संक्रमितांची आतापर्यंतची सर्वोच्च नोंद, एकाच दिवसात 3,86,452 जणांना संसर्ग, 3498 मृत्यू
Coronavirus | (Photo Credits: Pixabay)

भारतातील कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमितांची आतापर्यंतची सर्वोत उच्चांकी नोंद झाली आहे. एकाच दिवसात म्हणजे गेल्या 24 तासात तब्बल 3,86,452 जणांना संसर्ग झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनसार गेल्या 24 तासात 3,86,452 लोकांना संसर्ग तर 3498 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नव्या संक्रमितांमुळे देशात उपचार घेणाऱ्या सक्रिय कोरोना (Covid 19) रुग्णांची संख्या 31,70,228 इतकी झाली आहे. तर आतापर्यंत कोरोना संसर्ग (Coronavirus In India) झालेल्या एकूण संक्रमितांची संख्या 1,87,62,976 इतकी झाली आहे. कोरनामुळे आतापर्यंत एकूण 2,08,330 लोक दगावले आहेत. तर उपचार घेऊन 1,53,84,418 लोक बरे झाले आहेत. कोरोना लसीकरणाबाबत बोलायचे तर 15,22,45,179 नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

2021 या वर्षाच्या सुरुवातीच्या तीन महिन्यांच्या तुलनेत एप्रिल महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. कोरोनाबाबत येत असलेल्या संख्येवारुन याचा अंदाज सहच येतो. एक एफ्रिलपर्यंत देशात 58,47,932 इतके नवे कोरोना रुग्ण नोंद झाले होते. एप्रिल मध्ये 38,719 इतक्या कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. या आधी 27 एप्रिल 2021 या दिवशी देशभरात कोरोना रुग्णांची संख्या 3,23,144 होती. हिच संख्या 26 एप्रिल रोजी 3,52,991 इतकी, 25 एप्रिल 3,49,691, 24 एप्रिल 3,46,786, इतकी, 23 एप्रिल या दिवशी 3,32,730 इतकी, तर 22 एप्रिल या दिवशी 3,14,835 इतके कोरोना रुग्ण नोंदले गेले.

कोरोना व्हायरसच्या वेगवेगळ्या म्यूटेशनमध्ये कोरोना व्हायरस संक्रमितांचया नव्या रुग्णांची भर पडत आहे. दरम्यान, उपचार घेऊन बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. ही दिलसादायक बाब आहे. देशभरात उपचार घेऊन बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या जवळपास 29 लाखांपेक्षाही अधिक झाली आहे. केंद्र सरकारने बुधवारी (28 एप्रिल) सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात 29,78,709 कोविड-19 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर देशातील एक्टीव्ह रुग्णांची संख्या 16.55% इतकी आहे. उपचार घेऊन बरे होणाऱ्यांची संख्या 82.33% इतकी राहिली आहे. तर आतापर्यंत 1.12% नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.