संपूर्ण जग कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाचा सामना करत आहे. भारतातही कोरोना बाधितांची वाढती संख्या पाहायला मिळत आहे. दिवसागणित कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. मागील 24 तासांतही 65,002 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर 996 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या वाढीमुळे 036 देशातील कोरोना बाधितांचा आकडा 25 लाख 26 हजार 193 वर पोहचला आहे. यापैकी 6 लाख 68 हजार 220 सक्रीय रुग्ण (Active Cases) आहेत. तर 18 लाख 08 हजार 937 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान कोरोना संसर्गामुळे एकूण 49 हजार 036 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून (Ministry of Health and Family Welfare) देण्यात आली आहे.
कोरोना व्हायरसवर औषध किंवा लस उपलब्ध नसल्याने कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवणे कठीण होत आहे. तरी देखील विविध उपाययोजना राबवत परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा सरकार कसोशीने प्रयत्न करत आहे. त्यामुळे देशाचा रिकव्हरी रेट सुधारत असून मृत्यू दरही कमी होत आहे. (महाराष्ट्रात आज 12 हजार 608 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; 364 जणांचा मृत्यू)
ANI Tweet:
Spike of 65,002 cases and 996 deaths reported in India, in the last 24 hours.
The #COVID19 tally in the country rises to 25,26,193 including 6,68,220 active cases, 18,08,937 discharged/migrated & 49,036 deaths: Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/mWu8IZ8XN3
— ANI (@ANI) August 15, 2020
दरम्यान आज स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरुन देशवासियांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील कोरोना लसीच्या विकासाची माहिती दिली. भारतीय वैज्ञानिक कोरोना लसीच्या विकासाकरीता ठोस पावलं उचलत आहेत. तसंच 3 वेगवेगळ्या लसी ट्रायल्सच्या विविध टप्प्यांमध्ये आहेत. त्यामुळे लवकरच आपल्याला स्वदेशी लस मिळेल अशी आशा आहे.