Pragya Thakur On Hemant Karkare: प्रज्ञा ठाकुर यांचे शहीद हेमंत करकरे यांच्याबाबत वादग्रस्त विधान
Pragya Thakur | Photo Credits: twitter)

भारतीय जनता पक्षाच्या (BJP) खासदार प्रज्ञा ठाकुर (Pragya Thakur) या नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. आताही त्यांनी केलेल्या विधानावरुन वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. मुंबई दहशतवादी हल्ल्यात (Mumbai Terror Attack) शहीद झालेले पोलीस अधिकारी हेमंत करकरे (Hemant Karkare) यांच्याबाबत प्रज्ञा ठाकुर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. प्रज्ञा यांनी या आधीही आपल्या शापामुळेच महाराष्ट्र केडरचे आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांचा मृत्यू झाल्याचे म्हटले होते. या विधानामुळे त्यांच्या पक्षाला तीव्र टीकेचा सामना करावा लागला होता. आता त्यानंतर पुन्हा एकदा प्रज्ञा सिंह यांनी अशाच प्रकारचे विधान केले आहे. त्यांनी पुन्हा एकदा म्हटले आहे की आपण हेमंत करकरे यांना देशभक्त मानत नाही.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी प्रज्ञा ठाकुर यांनी म्हटले आहे की, हेमंत करकरे काही लोकांसाठी देशभक्त होऊ शकतील. परंतू, अस्सल देशभक्त काही वेगळा विचार करतात. त्यांनी (करकरे) माझ्याबद्दल माहिती मिळविण्यासाठी माझे आचार्य-शिक्षक (स्कूल टीचर) आदींची बोटे आणि हाडे मोडली, तोडली. मला खोट्या प्रकरणात अडकवले. लोकसभा निवडणूक 2019 मध्ये काँग्रेसच्या दिग्विजय सिंह यांना पराभूत करणाऱ्या प्रज्ञा सिंह यांनी म्हटले की, भारतात पहिल्यांदा 1975 मध्ये अणीबाणी लादण्यात आली. 2008 मध्ये मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात मला अडकवण्यात आले तेव्हाही अशीच स्थिती होती.

ट्विट

प्रज्ञा ठाकुर यांनी या आधी महात्मा गांधी यांचे मारेकरी नथूराम गोडसे यालाही देशभक्त म्हटले होते. त्यांच्या या विधानाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही टीका केली होती. तसेच, त्यांनी असेही म्हटले होते की, या विधानाबद्दल मी प्रज्ञा ठाकुर यांना मनापासून कधीही माफ करु शकणार नाही.

अरुण यादव ट्विट

प्रज्ञा ठाकुर यांच्या या विधानानंतर काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि माजी प्रदेशाध्यक्ष अरुण यादव यांनी आपल्या ट्विटर हँडलवर लिहिले आहे की, ज्या प्रज्ञा सिंह यांनी आपल्या काम आणि आचरणाच्या माध्यमातून भगवे वस्त्र, हिंदुत्व आणि राष्ट्रधर्माला कलंकीत केले आहे. तसेच, त्यांना शिक्षण देणाऱ्या दिवंगत शिक्षांनाही काळीमा लावला आहे. त्यांची शिष्या आपले अपराध लपविण्यासाठी अनेक बॉम्बस्फोटांमध्ये आपल्या वरिष्ठ सहकारी आणि संघ प्रचारक सुनील जोशी यांचीही अन्य सहकाऱ्यांसोबत हत्या केली. धन्य आहे. भाजप आणि त्यांचे आतंकी उनुयाई.