Himani Narwal With Rahul Gandhi (फोटो सौजन्य - X/@MumbaichaDon)

Haryana Congress Worker Murder: हरियाणाच्या रोहतकमधून (Rohtak) एक मोठी खळबळजनक बातमी समोर आली आहे. येथे काँग्रेस महिला नेत्या हिमानी नरवाल यांची हत्या (Himani Narwal Murder) करण्यात आली. महिला नेत्याचा मृतदेह एका सुटकेसमध्ये आढळला. महिला नेत्याच्या हत्येचे वृत्त समोर आल्यानंतर काँग्रेसने कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून भाजप सरकारला घेरले आहे. दुसरीकडे, पोलिस या प्रकरणाचा तपास करण्यात व्यस्त आहेत. रोहतकमधील सांपलाजवळ सकाळी काँग्रेस महिला नेत्या हिमानी नरवाल यांचा मृतदेह एका बंद ब्रीफकेसमध्ये आढळला. सकाळपासूनच, पोलिस तो एक बेवारस मृतदेह असल्याचे समजून त्याची चौकशी करत होते. परंतु, नंतर हा मृतदेश हिमानी नरवाल यांचा असल्याचे समजले.

हिमानी नरवाल यांचा भारत जोडो यात्रेत सहभाग -

दरम्यान, राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत हिमानी नरवाल खूप सक्रिय होत्या. हिमानीच्या इन्स्टाग्राम आयडीवर राहुल गांधींसह अनेक काँग्रेस नेत्यांचे फोटो आहेत. रोहतकमध्येही हिमानी दीपेंदर हुड्डा आणि भूपिंदर हुड्डा यांच्या निवडणूक प्रचारात त्या सक्रिय होत्या. रोहतकचे काँग्रेस आमदार बीबी बत्रा यांनी हिमानीच्या हत्येची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली आहे. (हेही वाचा -Rahul Gandhi On Delhi Election Results: 'लढाई सुरूच राहील'; दिल्ली निवडणूक निकालांवर राहुल गांधींची प्रतिक्रिया)

भूपेंद्र हुड्डा यांनी केली उच्चस्तरीय चौकशीची मागणी -

तथापि, हिमानी नरवालच्या हत्येवर हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर हुड्डा यांचीही प्रतिक्रिया आली आहे. भूपिंदर हुड्डा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले आहे की, 'रोहतकमध्ये सक्रिय काँग्रेस कार्यकर्त्या हिमानी नरवाल यांच्या निर्घृण हत्येची बातमी अत्यंत दुःखद आणि धक्कादायक आहे. मी दिवंगत आत्म्याला श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबियांना माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करतो. अशा प्रकारे एका मुलीची हत्या आणि तिचा मृतदेह सुटकेसमध्ये सापडणे हे अत्यंत दुःखद आणि धक्कादायक आहे. हे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरील कलंक आहे. या हत्येची उच्चस्तरीय निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे आणि सरकारने पीडितेच्या कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा आणि दोषींना कठोर शिक्षा द्यावी.'

रोहतकमध्ये सापडला बंद सुटकेसमध्ये मृतदेह -

शनिवारी रोहतक जिल्ह्यातील सांपला शहराजवळ एका बंद ब्रीफकेसमध्ये एका तरुणीचा मृतदेह आढळला. संध्याकाळी, मृतदेह काँग्रेस कार्यकर्त्या हिमानी नरवालचा असल्याचे ओळख पटले. रोहतकचे काँग्रेस आमदार भारत भूषण बत्रा यांनी मुलीच्या हत्येची चौकशी करण्यासाठी आणि मारेकऱ्याला लवकरात लवकर अटक करण्यासाठी पोलिसांनी विशेष एसआयटी स्थापन करावी अशी मागणी केली आहे.