Congress Working Committee: काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल, CWC मध्ये नव्या चेहऱ्यांना संधी, दिग्गजांना डच्चू
Congress MLA Imran Khedawala. (Photo Credits: PTI)

काँग्रेस (Congress) पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी पक्षात आज (शुक्रवार, 11 सप्टेंबर 2020) मोठे संघटनात्मक फेरबदल केले. काँग्रेस पक्षाची कार्यकारिणी (Congress Working Committee) आणि निवड समिती (Central Election Authority) आज नव्याने जाहीर झाली. यात पक्षनेतृत्वाने पक्षाचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आजाद (Gulam Nabi Azad), अंबिका सोनी (Ambika Soni), मोतीलाल वोरा (Moti Lal Vohra), मल्लिकार्जून खडगे (Mallikarjun Khadge) आदी नेत्यांना महासचिव पदावरुन डच्चू देणयात आला.

दुसऱ्या बाजूला पक्षाने पक्षाध्यक्षांच्या सल्लागारामध्ये काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांचा समावेश केला. काँग्रेस पक्षाने आज जाहीर केलेले नवे फेरबदल म्हणजे पक्षातील नव्या बदलांना झालेली सुरुवात असल्याचा अर्थ काढला जातो आहे. नव्या बदलांनुसार देशभरातील विविध प्रभारीही बदलण्यात आले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नव्या बदलांमध्ये राहुल गांधी यांच्याशी जवळीक असलेल्या नेत्यांना पक्षातील पदांवर मोठे स्थान देण्यात आले आहे. (हेही वाचा, Ramdas Athawale Advice Congress Party: राहुल गांधी तयार नाहीत? काँग्रेस पक्षात राष्ट्रवादी विलीन करा शरद पवार यांना अध्यक्ष बनवा, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा सल्ला)

दरम्यान, काँग्रेस पक्षाचे संघटन महासचिव केसी वेणउगोपाल यांनी पक्षाच्या वतीने दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, गुलाम नबी आजाद, मोतीलाल वोरा, अम्बिका सोनी आणि मल्लिकार्जून खडगे यांना पक्षाच्या महासचिव पदावरुन हटविण्यात आले आहे. आजाद हे त्या 23 नेत्यांपैकी एक आहेत ज्यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षनेत्यांना पत्र लिहून पूर्णवेळ अध्यक्षांची मागणी केली होती.  (हेही वाचा, खासदार सुरेश धानोरकर यांचा काँग्रेस पुनरुज्जीवीत करण्यासाठी पक्षाला महत्त्वपूर्ण सल्ला)

काँग्रस पक्षात गांधी कुटुंबीयांना कोणाचाही विरोध नाही. परंतू, पक्षाला पूर्णवेळ देणाऱ्या सक्रिय अध्यक्षाची आवश्यता आहे. त्यामुळे गांधी कुटुंबातील कोणी व्यक्ती जर पक्षाचे अध्यक्षपत स्वीकारणार नसेल. तर, पक्षातील इतर व्यक्तीकडे पक्षाध्यक्षपद सोपविण्यात यावे, अशी मागमी काँग्रेस पक्षातील काही नेत्यांनी हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. हे पत्र काँग्रेस मधील 23 नेत्यांनी पाठवले होते. यात पृथ्वीराज चव्हाण, मिलिंद देवरा, मुकुल वासणीक यांच्यासारख्या महाराष्ट्रातील नेत्यांसह काँग्रेस कार्यकारिणीतल नेत्यांचाही समावेश होता.  (हेही वाचा, Congress Party President: सोनिया गांधी पद सोडण्याची शक्यता, काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद कोणाकडे? 'त्या' पत्रामुळे राजकीय वर्तुळात नवी चर्चा)

काँग्रेस पक्षाध्यक्षांना पाठवलेल्या पत्रामुळे पक्षामध्ये मोठी खळबळ उडाली. काँग्रस वर्किंक कमेटी बैठकीतही या पत्रावर जोरदार खल झाला. तत्पूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही या पत्राला उत्तर देत आपणही अध्यक्ष पदावर राहण्यास इच्छूक नाही आहोत. सर्वांनी एकत्र येऊन सक्रीय अध्यक्ष नेमावा असे म्हटले. त्यानंतर काँग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणावर पडसाद उमटले. त्यानंतर त्याचे परिणाम आजच्या नव्या फेरबदलांमध्ये दिसून येत आहेत.