Mallikarjun Kharge's Health Deteriorates: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांची प्रकृती खालावली आहे. रविवारी जम्मूमधील जसरोटा विधानसभा मतदारसंघातील बरनोटी येथे भाषणादरम्यान ते बेशुद्ध पडले. यानंतर त्यांना काही मिनिटांसाठी भाषण थांबवावे लागले. त्यानंतर त्यांनी उभे राहून 2 मिनिटे भाषण केले. 'मी 83 वर्षांचा आहे. मोदींना सत्तेवरून हटवल्याशिवाय मी मरणार नाही,' असा दावाही यावेळी खरगे यांनी केला. खरगे यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही वेळातच डिस्चार्ज देण्यात आला.
मुलगा प्रियांकने दिली तब्येतीची माहिती -
कर्नाटक सरकारचे मंत्री आणि मल्लिकार्जुन खरगे यांचा मुलगा प्रियांक खर्गे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर आपल्या वडिलांच्या प्रकृतीची माहिती दिली आहे. प्रियांकने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'जम्मू-काश्मीरच्या जसरोटा येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना वडील मल्लिकार्जुन खर्गे यांना थोडे अस्वस्थ वाटले. वडिलांची वैद्यकीय पथकाने तपासणी केली आहे. शरीरात रक्ताची पातळी थोडी कमी आढळली आहे. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती सुधारत आहे. सर्वांच्या काळजीबद्दल मी खूप आभारी आहे. त्याची जिद्द आणि लोकांच्या शुभेच्छा त्याला खंबीर ठेवतात.' (हेही वाचा -Mallikarjun Kharge : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे याचे पंतप्रधान मोदींना पत्र; पक्षाच्या जाहीरनाम्यावर चर्चेचे आवाहन)
Congress President Sri @kharge felt slightly unwell while addressing a public meeting in Jasrota, Jammu & Kashmir.
He has been checked upon by his medical team and apart from slightly low blood pressure, he is doing well.
Extremely grateful for everyone's concern.
His…
— Priyank Kharge / ಪ್ರಿಯಾಂಕ್ ಖರ್ಗೆ (@PriyankKharge) September 29, 2024
मी 83 वर्षांचा आहे, इतक्या लवकर मरणार नाही - खरगे
प्रकृती खालावल्यानंतर खरगे यांनी सभेला संबोधित करताना सांगितले, राज्याचा दर्जा बहाल करण्यासाठी आम्ही लढू. मी 83 वर्षांचा आहे, मी इतक्या लवकर मरणार नाही. पंतप्रधान मोदी सत्तेबाहेर होईपर्यंत मी जिवंत असेन. तथापी, मोदी सरकारवर निशाणा साधत खरगे म्हणाले, 'या लोकांना कधीच निवडणुका घ्यायच्या नव्हत्या. त्यांना हवे असते तर एक-दोन वर्षात निवडणुका घेता आल्या असत्या. त्याला लेफ्टनंट गव्हर्नरच्या माध्यमातून रिमोट कंट्रोल्ड सरकार चालवायचे होते.'
सरकारने तरुणांना काहीही दिलेले नाही – खरगे
पंतप्रधान मोदींनी गेल्या 10 वर्षात भारतातील तरुणांना काहीही दिलेले नाही. 10 वर्षांत तुमची समृद्धी परत आणू शकत नाही अशा व्यक्तीवर तुम्ही विश्वास ठेवू शकता का? भाजपचा कोणताही नेता तुमच्यासमोर आला तर त्याला विचारा की त्यांनी समृद्धी आणली की नाही?