Mallikarjun Kharge : लोकसभा निवडणुक २०२४ च्या तिसऱ्या टप्प्यासाठी ७ मे रोजी मतदान पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस(Congress)च्या 'विभाजन' अजेंड्याबद्दल स्पष्टपणे बोलण्यासाठी खर्गे यांनी पंतप्रधानांना(PM Modi) पत्र लिहिले आहे. भाजप (BJP) उमेदवारांनी लिहिलेल्या पत्रातून भाजपमध्ये निराशा आणि चिंता असल्याचे स्पष्ट होते असे खर्गे म्हणाले आहे. ही भाषा पंतप्रधानांच्या कार्यालयाला शोभणारी नाही. तुमच्या भाषणातील खोटेपणा उघड झालेला तुम्हाला अपेक्षित नाही. त्या उलट भाजप कार्यकर्त्यांनी तुमच्या भाषणातील खोटेपणाचा प्रसार करावा अशी तुमची इच्छा आहे. पण, हजार वेळा खोटे बोलूनही तो सत्यात येणार नाही. असे खर्गे यांनी पत्रात लिहिले आहे.
मल्लिकार्जुन खर्गे यांनी पुढे भाजपवर चिनच्या विषयावरून निशाणा साधला आहे. युवा न्याय, नारी न्याय, किसान न्याय, श्रमिक न्याय आणि हिसेदारी न्याय यासह लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाने जाहीरनाम्यात दिलेल्या हमींचा पुनरुच्चार केला. भाजपकूडन काँग्रेसवर केलेल्या राजकारणाच्या आरोपांवरून भाजपला प्रत्युत्तर देताना खरगे म्हणाले की, "गेल्या 10 वर्षात देशाने तुम्ही आणि तुमच्या मंत्र्यांचे चिनी विषयीचे मौन धोरण पाहिले आहे."
गलवान खोऱ्यात २० भारतीय जवानांना प्राण गमवावे लागले असतानाही चीनला 'घुसखोर' म्हणण्यास नकार दिल्याबद्दल खर्गे यांनी केंद्रावर निशाणा साधला. गेल्या 5 वर्षांत 54.76% ने चिनी आयात वाढवल्याचा आरोपही त्यांनी केंद्रावर केला आहे. काँग्रेस एससी, एसटी आणि ओबीसी असा जातीचा उच्चार करून "व्होटबँक' त्यांच्याकडे वळवणार असल्याच्या पंतप्रधान मोदींच्या आरोपाला उत्तर देताना, खरगे यांनी स्पष्ट केले की "व्होट बँक" मध्ये वंचित, महिला, आकांक्षा असलेल्या तरुणांसह सर्व भारतीयांचा समावेश आहे.
कामगार वर्ग, दलित आणि आदिवासी आहेत. "आमची व्होटबँक प्रत्येक भारतीय आहे. सर्वांना माहित आहे की आरएसएस आणि भाजप यांनी 1947 पासून प्रत्येक टप्प्यावर आरक्षणाला विरोध केला आहे. आरएसएस आणि भाजप हे आरक्षण संपवण्यासाठी संविधानात बदल करू इच्छितात. तुम्ही अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसींना त्यांच्या लोकसंख्येच्या आधारे आरक्षण देण्यास विरोध का करत आहात हे स्पष्ट केले पाहिजे. गुजरातमधील दलित शेतकऱ्यांकडून करोडोंचा गैरवापर केला गेला. भाजपने ‘बेकायदेशीर आणि असंवैधानिक मार्गाने’ ८,२५० कोटी रुपये कमावल्याचा दावा खर्गे यांनी केला.