देवरिया: Congress पक्षातील उमेदवाराला तिकिट दिल्याने विरोध करणाऱ्या महिलेला कार्यकर्त्यांकडून मारहाण (Watch Video)
काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद (Photo Credits-ANI)

उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील टाउन हॉल स्थित असलेल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात शनिवारी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत काँग्रेसचे उमेदवार मुकुंद भास्कर मणि यांचे स्वागत होणार होते. मात्र यावेळी तारा यादव यांचा राष्ट्रीय सचिव सचिन नायक यांच्यासोबत वाद झाला,. हा वाद ऐवढ्या टोकाला गेला ही मारहाणी पर्यंत जाऊन पोहचला. या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे. त्यामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी तारा यादव यांना मारहाण केली आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर या प्रकरणाची चर्चा आता सर्वत्र केली जात आहे.

खरंतर उत्तर प्रदेशातील 7 विधानसभेच्या जागांसाठी येत्या 3 नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे. देवरिया येथील जागा त्यापैकीच एक आहे. मुकुंद भास्कर मणि या विधानसभेच्या जागेचे उमेदवार म्हणून निवडण्यात आले आहेत. याच कारणास्तव त्यांच्या स्वागतासाठी काँग्रेसच्या कार्यालयात बैठक आयोजित केली होती.(Hyderabad: घरगुती वादामुळे महिलेचे निर्दयी कृत्य; आईच्या मदतीने वृद्ध सासूला केली मारहाण, घटना CCTV मध्ये कैद)

या बैठकीत राष्ट्रीय सचिव आणि प्रदेश प्रभारी सचिन नायक यांची सुद्धा उपस्थिती दिसून आली. पक्षाच्या या बैठकीत आगामी निवडणूकीसाठी काय रणनिती असणार या संदर्भात चर्चा होणार होती. त्याचवेळी पक्षातील नेत्री तारा यादव या फुलगुच्छ घेऊन पोहचल्या. तेथेच त्यांची सचिन नायक यांच्यासोबत बाचाबाची झाली. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, त्यांना निवडणूकीसाठी तिकिट न दिल्याने त्या नाराज होत्या.

वाद झाला तेव्हा तारा यादव यांनी राष्ट्रीय सचिव यांना धक्का दिला. त्यानंतर त्यांनी सुद्धा नेत्री तारा यादव यांना मारले. व्हायरल झालेल्या व्हिडिओतून स्पष्ट दिसून येते की, अन्य काही कार्यकर्त्यांनी सुद्धा त्यात उडी घेत मारहाण सुरु केली. हे सर्व सुरु असताना तारा यादव यांना कार्यालयातून बाहेर घेऊन गेले. मात्र तेव्हा सुद्धा तारा यादव यांनी ओरडून त्याच्या विरोध केला. ऐवढेच नाही तर बाहेर आल्यावर त्या म्हणाल्या की, कानाखाली मारुन बरे वाटले.

एका समाचार समूहासोबत बातचीत करताना त्यांनी असे म्हटले की, पक्षाने एका चुकीच्या व्यक्तीला तिकिट दिले आहे. मुकुंद भास्कर हा बलात्कारी व्यक्ती आहे. मी राष्ट्रीय सचिव यांना म्हटले होते की, त्यांनी एका चुकीच्या व्यक्तीला तिकिट दिले आहे. या पावलामुळे पक्षावर प्रभाव पडणार असून तिकिट अन्य कोणाला तरी द्यायला हवे होते. ज्याचे चरित्र आणि मार्ग उत्तम असेल. याच गोष्टीवरुन वाद निर्माण होत मारहाणीचा प्रकार घडला.

घटनेच्या नंतर तारा यादव यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्षांसह 4 नामांकित आणि अन्य जणांच्या विरोधात मारहाण आणि छेडछाड केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. तर काँग्रेसच्या अन्य कार्यकर्त्यांचे असे म्हणणे आहे की, तारा यादव यांना देवरिया येथील जागेचे तिकिट हवे होते. मात्र या जागेसाठी अर्ध्याहून अधिक जण उमेदवारीसाठी होते. याच कारणास्तव नाराज होत काँग्रेस नेत्रीने पक्षाच्या राष्ट्रीय सचिवांसोबत गैरव्यवहाक केला. त्यांनी केलेले सर्व आरोप हे चुकीचे आहेत.