Rahul Gandhi | (Photo Credit- Twitter)

Violence-Hit Manipur: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandh) दोन दिवसांच्या मणीपूर दौऱ्यावर आहेत. मणीपूर राज्यामध्ये राज्यांतर्गत विविध समुदयांमध्ये सुरु असलेल्या संघर्षात मोठ्या प्रमाणावर हिंसाचार सुरु आहे. पाठिमागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या या हिंसक संघर्षामुळे हे राज्य अक्षरश: धुमसतंय. अशा स्थितीत राहुल गांधी यांनी या राज्याचा दौरा काढला आहे. AICC सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दौऱ्यासाठी राहुल हे दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानावरुन निघाले आहेत.

केसी वेणुगोपाल यांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल गांधी हे आपल्या दौऱ्यात इंफाळ आणि चुराचंदपूर येथील समाजाच्या काही प्रतिनिधींशी संवाद साधतील. राहुल गांधी हे 29 आणि 30 जून रोजी मणिपूरला भेट देणार आहेत. ते आपल्या भेटीदरम्यान मदत शिबिरांना भेट देतील आणि इम्फाळ आणि चुरचंदपूर येथील काही समाजाच्या प्रतिनिधींशी संवाद साधतील, असे वेणुगोपाल यांनी आपल्या ट्विटमध्ये दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे.

मणिपूर राज्यात एकदोन दिवस नव्हे तर पाठिमागच्या दोन महिन्यांपासून हिंसक संघर्ष सुरु आहे. या समूहाला संघर्ष थांबवून शाततेच्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न करायला हवा. त्यासाठी त्यांना प्रतिसादात्मक संवादाची गरज आहे. हिंसाचार ही एक मानवी शोकांतीका आहे. त्यामुळे त्यावर मात करणअयासाठी प्रेमाचीच शक्ती वापरली जाणे आवश्यक आहे. राहुल गांधी तेच करत आहेत, असे वेणुगोपाल यांनी म्हटले आहे. (हेही वाच, Rahul Gandhi Birthday: राहुल गांधी- काँग्रेस अध्यक्ष, भारत जोडो यात्रा, पराभव, शिक्षण आणि राजकीय करिअर; घ्या जाणून, 'एका संघर्षाचा प्रवास')

व्हिडिओ

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पाठिमागच्या दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या हिंसाचारात मणिपूरमधील 130 नागरिकांनी आतापर्यंत आपले प्राण गमावले आहेत. मणिपूरमधील हिंसाचार नियंत्रणात आणून शांततार प्रस्थापीत करण्यासाठी या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे.

दरम्यान, मणीपूर हिंसाचार प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी (24 जूलै) सर्वपक्षीय बैठक बोलावली. या बैठकीत त्यांनी राज्यातील शांतता प्रस्थापित करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने केलेल्या प्रयत्नांची तपशीलवार माहिती दिली. सरकारने राज्यात सुमारे 36,000 सुरक्षा कर्मचारी तैनात केले आहेत आणि 40 आयपीएस अधिकारी देखील मणिपूरमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत, असे ते म्हणाले.