Parliament Monsoon Session: महिला, पुरुष खासदारांना धक्काबुक्कीसाठी बाहेरुन लोक राज्यसभेत आणले; काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi | | (Photo Credits: ANI/Twitter)

संसदेचे पावसाळी अधिवेशन यंदा वेळेपूर्वीच गुंडाळण्यात आल्यावरुन तसेच, वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेत काही महिला खासदारांवर कथीत हल्ला झाल्यावरुन काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि इतर विरोधी पक्षांनी गुरुवारी सकाळी संसदेबाहेर मोर्चा काढला. वृत्तसंस्था एएनआयने राहुल गांधी यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, 'आज आम्ही प्रसारमाध्यमांसोबत चर्चा करणयासाठी आलो आहोत कारण आम्हाला संसदेत बोलण्याची संधी दिली जात नाही. हे लोकशाहीची हत्या आहे. संसदेचे अदिवेशन तर संपले. परंतू, देशातील 60% जनतेचा प्रश्न आहे. कोणत्याही प्रकारे अधिवेशन झाले नाही. देशाच्या 60% आवाजाला दाबण्यात आले, अपमानीत करण्यात आले. राज्यसभेत (Rajya Sabha) काल (11 ऑगस्ट) शारीरिक स्वरुपात मारहाण झाली.'

राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांनी गुरुवारी (12 ऑगस्ट) सरकार विरोधात आंदोलन केले. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खडगे यांच्या दालनात बैठक झाल्यानंतर विरोधी पक्षांनी संसद भवन ते विजय चौक पर्यंत पायी मोर्चा काढला. या वेळी अनेक नेत्यांच्या हातात बॅनर आणि पोस्टर होते. (हेही वाचा, Sanjay Raut On Marshall Law: 'लोकशाहीच्या मंदिरात मार्शल कायदा', शिवसेना खासदार संजय राऊत यांचे केंद्र सरकारवर टीकास्त्र)

एएनआय ट्विट

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे की, संसदेमध्ये विरोधी पक्षांना आपले म्हणने मांडण्याची संधी दिली नाही. बुधवारी महिलांबाबत जी घटना घडली ती लोकशाहीच्या विरोधात आहे. असे वाटते आहे की, आम्ही पाकिस्तानी सीमेवर उभे आहोत. त्या आधी बुधवारी राज्यसभेत विरोधी खासदारांनी विमा सुधारणा बिल सादर करत असताना केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. संजय राऊत यांनी राज्यसभेतील एक फोटो ट्विट करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. यात 'ही आपली संसदीय लोकशाही आहे का?' असा सवाल उपस्थित करत 'लोकशाहीच्या मंदिरात मार्शल कायदा', अशी टीका केली आहे.

एएनआय ट्विट

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आरोप केला की, महिला खासदारांवर हल्ला करण्यासाठी 40 पेक्षा अधिक महिला-पुरुषांना संसदेत आणले गेले.