Congress Star Campaigners: कन्हैया कुमार, नवजोत सिंह सिद्दू यांच्यावर मोठी जबाबदारी; काँग्रेसच्या स्टार कॅम्पेनर्सची यादी जाहीर
Kanhaiya Kuma and Navjot S Sidhu | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

काँग्रेस (Congress ) पक्षाने कन्हैया कुमार (Kanhaiya Kumar) आणि नवजोत सिंह सिद्दू (Navjot S Sidhu) यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. कन्हैया कुमारने नुकताच काँग्रेस प्रवेश केला. त्याच्या पक्ष प्रवेशाची राजधानी दिल्ली आणि देशाच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा असतानाच काँग्रेसने त्याच्यावर स्टार कॅम्पेनर्सची (Congress Star Campaigners) जबादारी दिली आहे. काँग्रेसने आपल्या स्टार कँपेनर्सची यादी आज जाहीर केली. यात कन्हैया कुमार आणि नवजोत सिंह सिद्दू यांच्यासह सचिन पायलट, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी, भूपिंदर हुड्डा, आनंद शर्मा, राजीव शुक्ला यांचाही समावेश आहे.

हिमाचल प्रदेश विधानसभा आणि लोकसभा पोटनिवडणुकीसाठी येत्या 30 ऑक्टोबरला हिमाचल प्रदेशमध्ये मतदान पार पडत आहे. तत्पूर्वी काँग्रेसने ही यादी जाहीर केली आहे. काँग्रेसकडून आज एकूण 20 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. हिमाचलप्रदेश विधानसभा निवडणुकीस 30 ऑक्टोबरला मतदान पार पल्यानंतर 2 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. (हेही वाचा, Kanhaiya Kumar यांनी CPI कार्यालयातून AC ही काढून नेला)

ट्विट

कन्हैय्या कुमार आणि नवजोत सिंग सिद्धू यांच्याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. आपल्या आक्रमक आणि मुद्देसुद भाषणांसाठी कन्हैय्या कुमार प्रसिद्ध आहे. तर नवजोत सिंह सिद्धू हे आपल्या खास शैलीतील भाषणासाठी प्रसिद्ध आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वीच त्यांनी पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे ते चर्चेत आहेत. तर कन्हैया कुमार यांनी नुकताच डाव्या पक्षातून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे दोन्ही नेते सध्या चर्चेच्या झोतात आहेत.