Sushma Swaraj & Harish Salve (Photo Credits: YouTube/Screengrab)

भारताच्या माजी परराष्ट्र मंत्री आणि कुशल प्रशासक, अजातशत्रू व्यक्तिमत्त्व सुषमा स्वराज यांच्या निधनाचं वृत्त समजताच अनेकांचा या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता. मात्र रात्री उशिरा सुषमा स्वराज (Sushma Swaraj) यांच्या निधनाच्या वृत्ताची अधिकृत पुष्टी करण्यात आली आहे. सामान्यांपासून देशा-परदेशातील दिग्गज नेते मंडळींनी सुषमा स्वराज यांच्या निधनाच्या वृत्तावर हळहळ व्यक्त केली आहे. हेरगिरीच्या आरोपात पाकिस्तानात कारागृहामध्ये असलेले कुलभूषण जाधव (Harish Salve) यांचे वकील हरीश साळवे यांनी देखील सुषमा स्वराज यांच्या निधनाचे वृत्त स्तब्ध करणारे असल्याचं म्हटलं आहे. रात्री 8.45 च्या दरम्यान सुषमा स्वराज यांच्यासोबत बोलणे झाले आणि त्यांनी आज (7 ऑगस्ट) दिवशी आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये कुलभूषण जाधव प्रकारात भारताच्या बाजूने कौल मिळाल्याने त्याची एक रूपया फी देण्यासाठी त्यांना आमंत्रण दिले होते. असे हरीश साळवे यांनी मीडीयाशी बोलताना म्हटले आहे. भारताच्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यावर आज दुपारी 3 वाजता होणार अंत्यसंस्कार

हरीश साळवे यांनी 'एबीपी माझा' ला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये कुलभूषण जाधव यांच्या खटल्यामध्ये भारताला मिळालेल्या यशाचं कौतुक केलं, त्यांच्याशी झालेला संवाद भावनिक होता असेही त्यांनी म्हटलं आहे. सुषमा स्वराज यांच्या जाण्यामुळे देशाप्रमाणेच माझं वैयक्तिक नुकसान झालं आहे. माझी मोठी बहीण आता जगात राहिली नाही असं म्हटलं आहे. कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती; आंतरराष्ट्रीय न्यायालयात निकाल भारताच्या बाजूने, पाकिस्तानला दणका

कुलभूषण जाधव यांच्यावर पाकिस्तानामध्ये हेरगिरीचा ठपका ठेवत त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती. मात्र आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये हरीश साळवे यांनी भारताची बाजू लढवली आणि फाशीच्या निर्णयावर स्थगिती मिळवली आहे. आता पाकिस्तानामध्ये कुलभूषण जाधव यांना काऊंसलर अ‍ॅक्सेस मिळणार आहे.