कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती; आंतरराष्ट्रीय न्यायालयात निकाल भारताच्या बाजूने, पाकिस्तानला दणका
या खटल्यात भारत सरकार विरुद्ध पाकिस्तान सरकार असे दोन देश एकमेकांविरुद्ध प्रतिवादी होते. गेली प्रदीर्घ काळ हा खटला सुरु होता. आज या खटल्यावर अंतिम सुनावणी झाली. भारत, पाकिस्तान देशांसोबतच जगभरातील जाणकारांचे लक्ष या खटल्याकडे लागले होते. सर्वसामान्य नागरिकांनाही या खटल्याबाबत प्रचंड उत्सुकता होती.
भारतीय नागरिक आणि नौदलाचा माजी अधिकारी कुलभूषण जाधव खटल्यात आंतरराष्ट्रीय न्यायालयाने ( International Court Of Justice) आपला निर्णय दिला आहे. या खटल्यात भारताचा मोठा विजय झाला आहे. ICJ ने पाकिस्तानी न्यायालयाने कुलभूषण जाधव (Kulbhushan Jadhav ) यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. तसेच, पाकिस्तानी कोर्टाने कुलभूषण जाधव यांना ठोठावलेल्या शिक्षेचा पूनर्विचार करावा असेही आंतरराष्ट्रीय न्यायालयाने म्हटले आहे.
दरम्यान, कुलभूषण जाधव यांना बचाव करण्यासाठी आवश्यक काऊन्सिलर अॅक्सीस देण्याचे आदेशही आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला दिले आहेत.
The Hague,Netherlands: #KulbhushanJadhav case's verdict to be pronounced by International Courts of Justice shortly pic.twitter.com/oU3os3R2d3
— ANI (@ANI) July 17, 2019
या खटल्यात भारत सरकार विरुद्ध पाकिस्तान सरकार असे दोन देश एकमेकांविरुद्ध प्रतिवादी होते. गेली प्रदीर्घ काळ हा खटला सुरु होता. आज या खटल्यावर अंतिम सुनावणी झाली. भारत, पाकिस्तान देशांसोबतच जगभरातील जाणकारांचे लक्ष या खटल्याकडे लागले होते. सर्वसामान्य नागरिकांनाही या खटल्याबाबत प्रचंड उत्सुकता होती.
आंतरराष्ट्रीय खटल्यात आपली बाजू मांडण्यासाठी भारत आणि पाकिस्तान अशा दोन्ही देशांच्या वकिलांची फौज न्यायालयात पोहोचली होती. या प्रकरणात सुनावणी 16 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर केली गेली. या पिठाचे प्रमुख जज अब्दुलकावि अहमद युसूफ हे आहेत.
कुलभूषण जाधव हे सध्या पाकिस्तानातील कारागृहात आहेत. पाकिस्तानने दावा केला आहे की, पाकिस्तानी सुरक्षा दलाच्या जवानांनी 3 मार्च 2016 रोजी हेरगिरी आणि दहशतवाद अशा दोन्ही आरोपाखाली त्यांना बलूचिस्तान येथे अटक केले. हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानातील मिलिटरी कोर्टाने एप्रिल 2017 मध्ये कुलभूषण जाधव यांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली होती. पाकिस्तानच्या या भूमिकेविरुद्ध भारताने मे 2017 मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती.
(The above story first appeared on LatestLY on Jul 17, 2019 06:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

